Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Shocking Viral Video : क्रिकेटच्या मैदानात खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, VIDEO आला समोर

Heart Attack Viral Video : नोएडा येथे ही घटना घडली आहे. क्रिकेट सामना सुरु असतानाच एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

प्रविण वाकचौरे

Viral Video :

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमधील घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक घटनांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशीच एक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे.

मैदानात क्रिकेटचा सामना सुरु असताना एका तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोएडा येथे ही घटना घडली आहे. क्रिकेट सामना सुरु असतानाच एका खेळाडूचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. विकास नेगी असे मृत तरुणाचे नाव आहे. इंजिनीअर असलेला विकास अवघा ३४ वर्षांचा होता. विकास हा मूळचा उत्तराखंडचा होता. तो सध्या दिल्लीतील रोहिणी येथे राहत होता.  (Latest News)

शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर 135 मध्ये बनवलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना सुरू होता. सामन्याच्या पहिल्या डावातच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

व्हि़डोओतील दृष्यांनुसार विकास नेगी आणि दुसरा एक खेळाडू खेळपट्टीवर उपस्थित होते. समोरच्या खेळाडूने शॉट मारला आणि दुसऱ्या टोकाला उभा असलेला विकास धाव घेण्यासाठी धावला. चेंडू सीमारेषेपर्यंत गेल्याने दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर मधोमध काहीवेळ थांबले आणि परत माघारी फिरु लागले.

विकास दुसऱ्या टोकाकडे जात असताना अचानक खेळपट्टीवर कोसळला. त्यानंतर सगळे खेळाडू त्यांच्याकडे धावले. इतर खेळाडूंनी लगेच विकासला सीपीआर दिला. नंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगे आणि सुरेश धस हत्येच्या कटानंतर करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर स्फोटक आरोप|VIDEO

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Baal Aadhaar Card: नवजात बालकांचं आधार कार्ड कसं काढायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस वाचा

Mobile Recharge Hike: मोबाईल रिचार्ज होणार महागणार; Jio-Airtel-Vi चा ग्राहकांना दणका

Maharashtra Politics: स्थानिक नेत्यांनी माझा घात केला, भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा; ढसाढसा रडत म्हणाले...

SCROLL FOR NEXT