Funny Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Funny Viral Video: शाळेत पाळीव प्राणी आणण्याची स्पर्धा; चिमुकल्याने आणलेला प्राणी पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांची उडाली धांदळ

Elephant In School: प्रत्येक पाळीव प्राण्याची फक्त पुस्तकी नाही तर संपूर्ण माहिती मुलांना मिळावी यासाठी त्यांनी शाळेत प्रत्येकाला एक पाळीव प्राणी घेऊन येण्यास सांगितल आहे.

Ruchika Jadhav

School Viral Video:

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान दिले जाते. यामध्ये फक्त पुस्तकी वाचन, लिखाण आणि पाठांतर या व्यतिरिक्त देखील ॲक्टिवीटी करून घेतल्या जातात. अशाच एका शाळेत विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांवर एक प्रोजेक्ट देण्यात आला होता. या प्रोजेक्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. प्रत्येक पाळीव प्राण्याची फक्त पुस्तकी नाही तर संपूर्ण माहिती मुलांना मिळावी यासाठी त्यांनी शाळेत प्रत्येकाला एक पाळीव प्राणी घेऊन येण्यास सांगितल आहे. यातील काही विद्यार्थी घरातील विविध पाळीव प्राणी घेऊन आलेत.

पाळीव प्राण्यांच्या या प्रोजेक्टसाठी मुलांना शाळेतून एक मैदान दिलं गेलंय. या मैदानात कोणी कोंबडी तर कोणी बकरी, पोपट, कबुतर, मांजर आणि अनेकांनी कुत्रा आणला आहे. मुलांनी आणलेले हे प्राणी पाहून सर्वच शिक्षक खुश असतात. साधारण सर्वांच्या घरी हेच प्राणी पाळले जातात. मात्र एका चिमुकल्याने या सर्व प्राण्यांना मागे सारत थेट एक हत्ती आणला आहे.

हत्तीवर बसून हा चिमुकला शाळेत आलाय. शाळेत कोणी हत्ती घेऊन येईल याचा कोणत्याही शिक्षकाने विचार केला नव्हता. मात्र शाळेत भला मोठा हत्ती आल्याने सारेच चकित झालेत. सर्वजण या हत्ती भोवती घोळका करून उभे आहेत. शिक्षकांनी देखील हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @marathi_trolls या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. नाद केला भाऊने , असं एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. बर झालं हत्ती होता. नाहीतर काही मुलं वाघ सुद्धा आणतील, असं एकाने लिहिलं आहे. तर आणखी एका व्यक्तीने अमरेंद्र बाहुबली अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT