Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्तच! शिट्ट्या, टाळ्या अन् रेल्वेचा हॉर्न, मुंबईकरांनी उत्साहात केलं नव्या वर्षाचं स्वागत; CSMT स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबईमधील एका स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नवीन वर्षाची सुरुवात स्टेशनवर प्रवाशांनी धमाकेदार केलेली आहे. तुम्हीही व्हायरल व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

New Year Celebration: संपूर्ण देशासह अन्य देशात काल नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी फिरायला जायचा प्लान केला तर काहींनी घरबसल्या नवीन वर्षाचे स्वागत केले, मात्र सध्या एक या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात चक्क प्रवाशांनी नवीन वर्षाचे स्वागत स्टेशनवर केलेले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सीएसएमटी स्टेशन दिसून येत आहे. सीएसएमटी स्टेशनवर अनेक प्रवाशी आहेत जे तिथे असलेल्या घड्याळमध्ये १२ वाजण्याची वाट पाहत असतात. स्टेशनवर असलेल्या इंडिकेटरवर १२ कधी वाजतात ते मोजत असतात, ज्या क्षणी १२ वाजतात तेव्हा ट्रेनचे हॉर्न वाजत नवीन वर्षाचे स्वागत केले. अनेकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

स्टेशनवरील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''rajtoday'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,'' मुंबई सीएसएमटी स्थानकावर आणि रेल्वे कारशेडवर नवीन वर्षाचे स्वागत आणि स्वागत करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता सर्व गाड्या एकत्रितपणे हॉर्न वाजवण्याची परंपरा कायम आहे. नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा'', असे लिहिण्यात आलेले आहे.

काही तासाच व्हिडिओ लाखो यूजर्संनी पाहिला असून व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कधीही न झोपणारे शहर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''माझी मुंबई मेरी जान'' तर ''नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुंबई मेरी जान'',अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT