Papani Butani Hanala Saam TV
व्हायरल न्यूज

Papani Butani Hanala: आमच्या पप्पांनी बुटानी हाणला...; तुफान कॉमेडीनं पोट धरून हसाल, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: नंतर आमच्या पाप्पांनी बुटांनी हाणला असं काहींनी म्हटलं आणि आता बुटानी हाणला या ओळी व्हायरल झाल्यात.

साम टिव्ही ब्युरो

Papani Butani Hanala:

आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. या गाण्यानंतर चिमुकला साईराज देखील चर्चेत आला. त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशात आता आमच्या पप्पांनी बुटानी हाणला असं गाणं व्हायरल झालं आहे. (Latets Marathi News)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. गणपती बाप्पावर चिमुकल्या साईराजने केलेला रील व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडला. नंतर आमच्या पप्पांनी बुटानी हाणला असं काहींनी म्हटलं आणि आता बुटानी हाणला हे गाणं व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर गणरायानंतर आता या गाण्याची क्रेज दिसत आहे.

तरुण मुलं, लहान मुलं तसेच सर्वच वयोगटातील व्यक्ती यावर रील व्हिडीओ बनवतायत. शक्यतो बाबांचा मार काही तरी चुका केल्यावरच खावा लागतो. सोशल मीडियावर काही तरुणांनी तसा सीन क्रियेट करत व्हिडीओ बनवला आहे.

सोलापूरमध्ये राहणाऱ्या आकाश चव्हान नावाच्या एका तरुणाने हे गाणं गायलंय. माझ्या पप्पांनी बुटानी हाणला त्याचं हे गाणं आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. @RATHOD FILMS PRODUCTION या युट्यूब अकाउंटवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केलाय.

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. काहीतरी ट्रेंडींग समोर आलं की नेटकरी तेच उचलून धरतात. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याने तो महाराष्ट्राचा लाडका झाला. गणरायाच्या आगमनावेळी हे गाणं आल्यानंतर साईराजच्या रील व्हिडीओमुळे सगळ्यांनी यावर व्हिडीओ बनवली.

या व्हिडीओमुळे साईराजला मोठी प्रसिद्धी मिळाली. चिमुकल्याला रील स्टार म्हणून त्याला सर्वजण ओळखू लागले. या गाण्याने त्याचं नशिब उजळं. तसेच गायक आणि संगीतकार प्रवीण कोळी यांच्या आगामी 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये साईराजला काम करण्याची संधी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT