Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video: कशासाठी पोटासाठी...! लोकलच्या बोगी डब्ब्यामध्ये लटकून प्रवास, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Mumbai Local Viral Video:सोशल मीडियावर सध्या मुंंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो अतिशय धोकादायक असा आहे.मात्र नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Mumbai Local Risky Travel Video: गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि उपनगरातील लाखोंच्या संख्येने चाकरमानी लोकल ट्रेनचा वापर करत आहेत.मुंबई सह त्याच्या उपनगरात अनेक नागरिक कामाच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहे,त्याचा परिणाम लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा संख्या वाढू लागली आहे.त्यातून लोकलमध्ये प्रवाशांना अफाट गर्दीचा सामना करावा लागत आहे.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात लोकल ट्रेनच्या दारात नाही तर लोकल ट्रेनच्या डब्ब्याच्या मधे उभं राहून एक प्रवाशी प्रवास करत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई शहरातील लोकल मार्गावरील एक स्टेशन दिसून येत आहे.ज्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मोठ्या गर्दीसह एक लोकल ट्रेन आहे.ज्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.मात्र,त्यातही एक लोकल ट्रेनमधील एक प्रवाशी आहे जो लोकलच्या दारात उभा राहिलेला नाही तर चक्क लोकलच्या दोन डब्ब्यामधे उभा आहे,अशा पद्धतीने तो अतिशय धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसून येत आहे.सर्व धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

लोकल प्रवाशाचा हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या 'adarshguptaaaaa' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होऊन तीन दिवस होताच आतापर्यंत एकोनसाठ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहेत तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज या व्हिडिओला आलेले आहेत.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांची विविध मतं!

मुंबई चाकरमान्याचा हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे तर काही संतापजनक मत व्यक्त केलेली आहे.त्यातील एका यूजरने प्रतिक्रिया बॉक्समध्ये कमेंट केली आहे,''लोकल ने प्रवास करणाऱ्या लोकांना पगार किती आहे...?''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की,''मुंबई आहे इथे जागा मिळत नाही जागा बनवून उभा राहावे लागते पोटापाण्यासाठी'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''जबाबदारी'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT