Online shopping 5% GST viral message fact check saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता ऑनलाईन शॉपिंग महागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के जीएसटी लावल्याचा दावा केलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..

Sandeep Chavan

तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय... पण, खरंच सरकारने आता ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के जीएसटी लागू केलाय का...? बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करतात...त्यामुळे खरंच यामध्ये आता अधिकचा जीएसटी लावण्यात आलाय का...? याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

ई-कॉमर्स डिलिव्हरी सेवांवर नवीन 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला.यामुळे आता शॉपिंग महागणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, घरबसल्या बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करत असतात...आणि जर आता जीएसटी वाढवला असेल तर ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे...त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

कॉमर्स डिलिव्हरी सेवांवर नवीन GST लावलेला नाही

या सेवांवरील GST18% वरून 5% पर्यंत कमी केला

दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा

डिलिव्हरी सेवांवर, म्हणजेच फूड ॲप्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांवर, पूर्वी 18% कर आकारला जात होता... 57 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत शिफारस केल्यानुसार, या डिलिव्हरी सेवांवरील कर आता 5% पर्यंत कमी करण्यात आलाय...ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्व डिलिव्हरी सेवांवर आता एकसमान 5% कर आकारला जातो...त्यामुळे, कोणताही नवीन कर लावण्यात आलेला नाही...उलट, करात कपात करण्यात आलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत ऑनलाईन शॉपिंग महागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल? 10 कंपन्यांना टाळं, इतर कंपन्यांचं काय?

Wednesday Horoscope: काही राशींचा आत्मविश्वास वाढणार, तर काहींना मित्रांची मिळणार मदत; वाचा राशीभविष्य

ऊस दरावरून दोन माजी मंत्र्यांनी एकमेकांचे बाप-काका काढले

SCROLL FOR NEXT