Mumbai Local Train Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video: हद्दच झाली राव! मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांची रंगली दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. याच लोकलमधून प्रवास करताना प्रत्येकाला विविध अनुभव येत असतात. लोकलमधील वादविवाद हे लोकल ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सवयीचा भाग बनलाय. मात्र, अनेकदा याच लोकल प्रवासात अनेक विचित्र घटनेचे व्हिडिओ पाहायल मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात लोकलमध्ये काही पुरुष प्रवासी मद्यपान करताना दिसत आहे.

व्हिडिओत धावत्या लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करताना दिसत आहे. काही व्यक्ती ट्रेनमध्ये काही बसून मद्यपान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून या प्रवाशांविरोद्धात कठोरात- कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांनी केली हद्द पार

व्हायरल व्हिडिओमध्ये काही पुरुष लोकलच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळत आहे. दरम्यान काही पुरुष प्रवासी लोकल(Local) डब्यात खाली बसलेले दिसून येतात. मात्र त्याच्या हातामध्ये मद्यपानाच्या काही बॉट्स दिसून येत आहेत. सर्व प्रकार त्याच डब्यात असलेल्या सह प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवरील @mumbai_tv या इन्स्टाग्रावर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.याआधीही सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झालेत तर कधी चित्र-विचित्र डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT