Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ही खरी संस्कृती! आजीबाईंचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...अशी ही पिढी पुन्हा होणे नाही; पाहा VIDEO

Ganpati Festival Viral Video: सोशल मीडियावर अनेक गणेशोत्सवाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच दोन आजींचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक शहर आणि गावानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या परंपरा आणि पध्दती निराळ्या आहेत. खास करुन कोकणात गणेशोत्सव अतिशय वेगळा साजरा करताना पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते वयोरुद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण गणेशोत्सवात रमून जातो. सध्या गणेशोत्सवानिमित्ताने या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दोन आजी गणेशोत्सवाने पारंपारिक खेळ खेळताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेक वयोरुद्ध व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. या व्हायरल व्हिडिओत कधी आजींचा डान्स असतो तर कधी कोणत्या काकांचाही लग्नाच्या वरातीत डान्स असतो. वयोरुद्ध व्यक्तींचे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात. आजही व्हायरल होत असलेला व्हिडिओही (Video) नेटकऱ्यांच्या किती पसंतीस आलेला आहे ते पाहूयात.

व्हायरल (Viral) व्हिडिओत एक घर दिसून येत आहेत. या घरात गणपती बाप्पाचे आगमन झालेले दिसत आहेत. यात या घरात दोन आजी आहेत. या आजींनी पारंपारिक लुगड नेसलेले आहे आणि डोक्यावर पदर घेतलेला आहे. अशातच दोघीही पारंपारिक गाण्यावर ताल धरत डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दोघींचा या वयातही डान्स (Dance) करण्याचा उत्साह अतिशय अनोखा दिसत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@milind33192'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. एक दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर करताच ३ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,'ही खरी संस्कृती'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''अशी माणसे परत होने नाही'' तर अनेकांनी या आजींचे कौतुक (Appreciation) केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाची हजेरी

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT