Nurse Scooter Ride In Hospital Yandex
व्हायरल न्यूज

Viral Video: दबंग नर्स! थेट स्कुटी घेऊन शिरली रुग्णांच्या वॉर्डात, VIDEO पाहून नेटकरी संतापले

Nurse Scooter Ride In Hospital: सध्या सोशल मीडियावर एका रूग्णालयातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक नर्स स्कुटी चालवत रूग्णांच्या वार्डात पोहोचली आहे.

Rohini Gudaghe

सध्या सोशल मीडियावर एका रूग्णालयातील व्हिडिओ व्हायरल (Viral News) होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक नर्स स्कुटी चालवत रूग्णांच्या वार्डात पोहोचली आहे. यूपीच्या पिलीभीत जिल्हा रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. या नर्सच्या कृत्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.

यूपीच्या पिलीभीत जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सच्या मनमानीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टाफमधील एक नर्स थेट रुग्णांच्या वॉर्डात स्कूटरवर बसून फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये (Nurse Scooter Ride In Hospital) दिसून येत आहे. तिच्या या कृत्यामुळे कॉरिडॉरमध्ये उपचारासाठी बसलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे. १७ सेकंदाचा हा व्हिडिओ मनोज शर्मा लखनौ युपी या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकरी नर्सवर कारवाईची मागणी करत आहेत. अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकण्यात (Viral Nurse Video) यावं, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. सोशल मीडियावर रूग्णालयातील अनेक व्हिडिओ समोर येत असतात. परंतु या व्हिडिओमुळे संतप्त वातावरण तयार झालं आहे.

आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका नर्सने काळ्या रंगाचा चष्मा लावलेला आहे. ती स्कुटीवर बसुन रूग्णालयात बिनधास्तपणे फिरत आहे. ती आजुबाजुला बसलेल्या रूग्णांची देखील पर्वा करत (Viral Video) नाहीये. अगदी मनसोक्तपणे ती रूग्णालयात फिरत आहे. याचा रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारचं वर्तन रूग्णालयामध्ये योग्य नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या नर्सवर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT