Nerul Viral Videos Saam Tv
व्हायरल न्यूज

Nerul Viral Videos: नेरूळमध्ये तरुणीवर भिकाऱ्याने केला जीवघेणा हल्ला! बसस्थानकावर उबी असताना डोक्यावर बाटली फोडून केले सपासप वार

Nerul News: सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन मुंबई येथील आहे. येथे एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने प्रहार केला.

Satish Kengar

Nerul Viral Videos:

सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन मुंबई येथील आहे. येथे एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने प्रहार केला. नंतर त्याचं फुटलेल्या काचेच्या बाटलीने तिच्यावर सपासप वार केले. ज्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. News 18 ने याबाबत वृत्त दिलं आहे.

News 18 च्या वृत्तानुसार, ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनांतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इमाम हसन शमशुद्दीन, असं या हल्लेखोरचं नाव आहे. या 21 वर्षीय पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्याने News 18 ला सांगितलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणारी ही तरुणी मित्रासोबत नेरूळ येथील एका महाविद्यालयात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती या परिसरातील एका बसस्थानकावर उभी असताना हा भिकारी घटनास्थळी आला. कोणताही आवाज न करता या भिकाऱ्याने काचेच्या रिकाम्या बाटलीने तिच्यावर हल्ला केला, अशी माहिती नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. (Latest Marathi News)

आरोपीने आधी तरुणीच्या डोक्यावर वार केले आणि नंतर काचेच्या तुकड्यांनी तिच्या पोटात वार केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. अधिकाऱ्याने सांगितले की, शमशुद्दीनने पीडितेवर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर माहिती गोळा करून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. शमशुद्दीनने तरुणीवर हल्ला का केला? याआधीही त्यांनी असं कृत्य केलं आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT