Nepal flood viral video claiming ancient Shaligram fact checked saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: नेपाळच्या पुरामध्ये 4 हजार कोटी वर्षे जुना शाळीग्राम सापडला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Nepal Flood Shaligram Found : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता नेपाळमध्ये महापुरात महाकाय शाळीग्राम वाहून आल्याचा दावा करण्यात आलाय. 4 हजार कोटी वर्षे जुनी ही शाळीग्राम असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच ही शाळीग्राम पुरात वाहून आलीय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

एका मोठ्या काळ्या दगडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.या दगडावर वर्तुळाकार आणि गोलाकार आकार दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की. हा एक सामान्य खडक नसून, हजारो वर्षांपासून हिमालयातील बर्फ आणि खडकांखाली गाडलेला एक प्रचंड शाळीग्राम दगड आहे, जो पूर आणि जोरदार प्रवाहामुळे नदीच्या संपर्कात आलाय असा दावा केलाय.

नेपाळमध्ये भीषण महापूर आला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला...ही 31 टन वजनाची विशाल शाळीग्राम असल्याचा दावा केलाय...आणि अंदाजे 4 हजार कोटी वर्षे जुना असून, त्याचा संबंध भगवान विष्णू आणि शिव यांच्या काळाशी जोडला जातोय..या दगडावर गोलाकार आणि चक्रासारखी आकृती स्पष्ट दिसतेय.ही शाळीग्राम साधी नसून हिमालयाच्या बर्फाखाली शेकडो-कोटी वर्षे दबालेला विशाल शालिग्राम असल्याचा दावा केला जातोय.

पण, खरंच हा एवढा जुना शाळीग्राम आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत आमच्या टीमने अनेक वेबसाईट पाहिल्या.अनेक मॅकझिन पडताळून पाहिले..तसेच गुगलवरून काही याबाबत माहिती मिळवली. तसेच काही तज्ज्ञांकडून याची अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

नेपाळ प्राचीन हिंदू संस्कृतीची भूमी

काली गंडकी नदी शाळीग्राम जीवाश्मांसाठी प्रसिद्ध

शाळीग्राम हे जीवाश्म झालेले अमोनाइट आहेत

महापुरात ही शाळीग्राम वाहून आलेली नाही

व्हायरल व्हिडिओ AI निर्मित बनवण्यात आला

हिंदू संस्कृतीत महत्त्व असलेल्या भगवान विष्णूंचं शाळीग्राम, महादेवाची पिंड, रुद्राक्ष अशा गोष्टी नेपाळमध्ये नैसर्गिकरित्या आढळून येतात. काली गंडकी नदीत छोटे छोटे शाळीग्राम आढळतात. पण, शाळीग्राम मोठ मोठ्या अवाढव्य आकाराचे दगड नसतात. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या खडकावर कोणीतरी हाताने कलाकृती केलेली दिसतेय. पृथ्वीचे अंदाजित वय सुमारे 454 कोटी वर्षे इतकं आहे. त्यामुळे ही शाळीग्राम 4 हजार कोटी वर्षे जुना असल्याचा दावा खोटा.हा व्हिडिओ AI निर्मित असून, आमच्या पडताळणीत महाप्रलयात नेपाळमध्ये विशाल शाळीग्राम वाहून आल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automatic car: ब्रेक दाबून कार स्टार्ट करणं का गरजेचं असतं?

Maharashtra News Live Update: सोलापूरात दुष्काळावरून ठाकरे गट आक्रमक! सरकारविरोधात जोरदार आंदोलन; ‘काजू-बदाम’ बैठकीवरूनही निशाणा

Hair Care: हेअर फॉल धांबून केस होतील घनदाट; केस धुण्याआधी फक्त लावा घरी तयार केलेलं 'हे' तेल

Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

एक व्यक्ती, दोन देशांचे पासपोर्ट! भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट बाळगणाऱ्याला अंबरनाथमधून अटक; मुंबई ATS च्या तपासाने खळबळ

SCROLL FOR NEXT