Accident Video Saam TV
व्हायरल न्यूज

Accident Video : बापरे! धावत्या कंटेनरचं चाक निघालं अन् ...; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

Accident CCTV Video : नाशिकमध्ये अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे. यामध्ये धावत्या कंटेनरचं एक चाक निखळून खाली पडलं आहे. हे चाक थेट पुढे एक कारवर आदळलंय.

Ruchika Jadhav

नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. कंटेनर रस्त्यावर जोरदार धावत असताना त्याचा टायर निखळला आहे. टायर निखळल्याने तो थेट दुसऱ्या एका कारवर आदळला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

घटनेबाबत मिळालेल्या आधिक माहितीनुसार, पार्थ पॅलेस या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली आहे. येथे रस्त्यावर एक कंटेनर वेगात जात होता. त्यावेळी कंटेनरचे अचानक एक चाक निखळले. चाक थेट रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनावर आदळले. यामुळे कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. कारमध्ये असलेल्या दोन्ही प्रवाशांचा जीव वाचला आहे. तसेच कंटेनर चालवणाऱ्या व्यक्तीचाही जीव वाचला आहे. दरम्यान या वर्दळीच्या ठिकाणी कंटेनरचे अचानक चाक निघाल्याने सर्वजण भयभीत झाले होते. या घटनेनंतर येणाऱ्या जाणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचा थरार कैद झालाय.

दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाहन चालकांनी आपल्या वाहनांची सर्विसींग करणे गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीच्या घटनांमुळे जीव जाण्याची शक्यता असते.

कोळशाच्या ट्रकने गायींना चिरडलं

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील बेसूर शिवारात देखील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एका कोळशाच्या ट्रकने गायींना चिरडलं आहे. या घटनेत दुदैवाने आठ ते दहा गाईंचा जागीच मृत्यू झालाय.

भरधाव ट्रक कोळसा घेऊन समुद्रपूरच्या दिशेने जात असताना उतारावर गाडी न्यूट्रल केली असल्यामुळे ट्रकवर नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दहा गाई अपघातात दगावल्याने गोपालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

अंदाजे 50 ते 60 हजार रुपये एका गायीची किंमत असून दहा गाईंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. पोलीस गावकरी घटनास्थळी दाखल झालेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करत ट्रक चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT