Nagpur Police Saam tv
व्हायरल न्यूज

Nagpur Police : अरे चाललंय काय? पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्यांचा डाव; जुगार खेळतानाचा पोलिसांचा VIDEO व्हायरल

Nagpur Police Video viral : नागपुरात पोलीस ठाण्यातच पत्यांचा डाव रंगला आहे. जुगार खेळतानाचा पोलिसांचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपुरातून पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चक्क पोलीस ठाण्यातच पत्त्यांचा डाव रंगल्याची बाब समोर आली आहे. पोलीस ठाण्यात आरोपी नव्हे तर चक्क पोलीस कर्मचारीच पत्ते खेळत असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीत हा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांचा पत्ता खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका तक्रारदाराने हे व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती मिळत आहे. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना दिसत आहेत. चक्क पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडपणे जुगार खेळतानाचा व्हिडिओमुळे नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते. पोलीस कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळून नागरिकांना सुरक्षित वातावरण देतील, अशी अपेक्षा नागरिकांना असते. त्यात पोलीसच पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले, तर कायदा सुव्यवस्थेचा काय होणार, असा प्रश्न या व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झाला आहे.

कारवाई होणार का?

नागपुरात मागील काही दिवसांत गुन्हेगारी वाढताना दिसत आहेत. नागपुरात मागील काही महिन्यांत हिट अँड रनच्या देखील घटना घडल्या आहेत. शहरतील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात करण्याऐवजी पोलीसच जुगार खेळत असल्याचे पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संतप्त नागरिकांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी निलंबनाची कारवाई करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT