काल रात्रीपासून सकाळी ५ पर्यंत नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. पावसाने रौद्र रूप धारण केल्याने शहरातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ढगफुटी सदृश्य पावसामुळे आख्ख नागपूर शहर पण्याखाली गेलं आहे. NDRF चे पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. पावसामुळे नागपूर शहरातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आलेत. (Nagpur Rain News)
ढगफुटी सदृश पावसाची तीव्रता नागपूरात अद्यापही जास्त आहे. गेल्या चार तासात १०९ मिली पावसाची नोंद झाली आहे. तर 90 मिली पाऊस दोन तासांत झाला आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून नाग नदीला पूर स्थिती आलीये.
आतापर्यंत 400 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. एका वयोवृद्ध आजींचा पावसामुळे मृत्यू झालाय. तसेच 14 जनावरांचा मृत्यू झालाय.
नागपुरात अनेक रस्ते जलमय झालेत. अंबाझरीमध्ये पावसामुळे जलजिवन विस्कळीत झालं आहे. सर्व रस्ते जलमय झालेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाट काढणे कठीण झाले आहे. अनेक व्यक्तींच्या घरांमध्येही पाणी साचले आहे. संपूर्ण घर पाण्यात बुडल्याने नागरिक कसाबसा आपला जीव वाचवून पळालेत.
नागपुरात गणेशपेठ, मणिशनगर, महाराज बाग या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. या सर्व ठिकाणी NDRF चे जवान अद्यापही नागरिकांचे स्थलांतर करत आहेत. सोशल मीडियावर पावसाचे भीषण वास्तव दाखवणारे आणि काळजात धडकी भरवणारे अनेक व्हिडीओ समोर आलेत. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.