Viral News Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral News: आजोबांच्या प्रेमाला सलाम! पत्नीला वाचवण्यासाठी बैलांशी केले दोन हात; घटना वाचून सॅल्यूट ठोकाल!

nagpur Viral News: सोशल मीडियावर अनेक जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात एका वयोरूद्ध नवऱ्याने जीवाची बाजी लावून आपल्या बायकोचे प्राण वाचवले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Husband Rescued Wife

सोशल मीडियावर अनेक जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी व्हिडिओ नवरा- बायकोच्या भांडणाचे असतात तर कधी त्यांच्यातल्या प्रेमळ नातं दर्शविणारे असतात. अशातच सोशल मीडियावर एक घटना समोर आली आहे,ज्यात एका वयोरूद्ध नवऱ्याने जीवाची बाजी लावून आपल्या बायकोचे प्राण वाचवले आहेत. नेमक कस ते आपण पाहूयात... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीसाठी लावली जीवाची बाजी....

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरात वास्तव्यास असणारे ग्यानबाजी धनविजय यांनी आपल्या वयाच्या ७९ वर्षी आपल्या पत्नीसाठी जीवाची बाजी लावलेली आहे. नागपूरात शुक्रवारी (ता.८)रोजी पहाटे ही घटना घडलीये. पहाटे झोपलेले असलेल्या धनविजय यांच्या घराबाहेरील गेट तोडून दोन बैलांनी त्याच्या घरात प्रवेश केला. काही तरी आवाज आल्याने धनविजय यांची झोप मोडली

तोपर्यंत बैल एका खोलीच्या बाजूला असलेल्या पॅसेजमध्ये घूसले. तिथे धनविजय यांची पत्नी झोपलेली होती. आपल्या पत्नीला काही होऊ नये यासाठी धनविजय बैलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. तेवढ्यात आपल्या हुशारीने धनविजय यांनी एका बैलाला वॉशरूममध्ये भरकटवले तसेच दुसरा बैल गेटच्या बाहेरच्या दिशेने गेला.

काही वेळानतंर वॉशरूमधून बैल बाहेर येताना दिसतो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धनविजय वॉटर कुलरच्या पाठीमागे लपतात, ज्यामध्ये चिडलेल्या बैलाने धडक दिल्याने कुलर त्याच्यांवर पडला. त्यानंतर बैल कुलरवर चढला आणि त्यात धनविजय मोठ्या कुलरमध्ये अडकले जातात. दैव बैलवत्तर म्हणून बैल धनविजय यांना अजून हाणी न पोहचवता तिथून निघून जातो.

दरम्यान धनविजय याच्या लहान मुलाने आणि मुलगी तिथं येते. दोघं मिळून वडिलांना कुलरमधून बाहेर काढतात. यात बैलांच्या धूमाकूळात धनविजय यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात नेण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: पुरावं मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

SCROLL FOR NEXT