Mumbai Local Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local: कशासाठी पोटासाठी! लोकलच्या दाराबाहेर लटकून महिलांचा जीवघेणा प्रवास; VIDEO Viral

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिला ट्रेनच्या दाराला लटकून जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत.

Siddhi Hande

मुंबई अन् लोकलचं नातं काही वेगळंच आहे. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. रोज सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी या ट्रेनमध्ये पाहायला मिळते. अनेकदा ट्रेन या उशिराने असतात. अशा काळात लोक अगदी जीवावर उदार होऊन प्रवास करतात. महिला बाहेर लटकून प्रवास करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिलांचा लोकलच्या दारावर लटकून जीवघेणा प्रवास

मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिला ट्रेनच्या दरवाज्यावर लटकून प्रवास करताना दिसत आहे. ही ट्रेन खचाखच भरलेली दिसत आहे. असं असतानाही महिला या ट्रेनने प्रवास करताना दिसत आहे. चार-पाच महिला तर आपल्या जीवावर खेळून बाहेर लटकलेल्या दिसत आहे.जर चुकून एखाद्या महिलेला धक्का किंवा तिचा हात सुटला तर तिच्या जीवावर बेतू शकतं. महिलांच्या या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हा ट्रेनचा आहे. दुसऱ्या ट्रेनमधून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. यामध्ये महिला पूर्णपणे बाहेर लटकलेल्या दिसत आहे. ट्रेनमध्ये आत जायलादेखील जागा नाहीये. त्यांचा हा प्रवास जीवघेणा ठरु शकतो.

सोशल मीडियावर रोज रेल्वेचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्यक्तीला कामावर जाण्याची घाई असते. कामावर जाण्यासाठी उशिर होऊ नये, यामुळे असा प्रवास रोज करतात. परंतु यामुळे तुमचा जीवदेखील जावू शकतो. त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी. कधीही असा ट्रेनला लटकून प्रवास करु नये. यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT