Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईत लेडी गॅंगची दहशत; मध्यरात्री दबक्या पावलांनी येतात अन्...

Shocking Viral Video: मध्यरात्री विनाकारण अपार्टमेंटची बेल बाजवून त्रास देणाऱ्या सुसिक्षित तरूणींचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Viral Video

मुंबईमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्यरात्री विनाकारण अपार्टमेंटची बेल बाजवून त्रास देणाऱ्या सुसिक्षित तरूणींचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान असताना आपल्यापैकी अनेकजणांनी शेजाऱ्यांच्या दारावरची बेल वाजवून पळून जाणे अशा गंमतीदार गोष्टी केल्याच असतील. पण सध्या सोशल मीडियावर दोन तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्या चक्क मध्यरात्री विनाकारण अपार्टमेंटची बेल बाजवून लोकांना त्रास देत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सुरुवातीस दिसते की, दोन तरुणी पायऱ्यांवरुन वर येताना दिसत आहेत. त्यांच्यातील सुरुवातीस वर येणारी तरुणी पुढे येते आणि लिफ्टच्या बाजूलाच असलेल्या दरवाजाची बेल वाजवायला लागते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या सोबत असलेली तरुणी तिच्या मोबाईलमध्ये तिच्या मैत्रिणीचा व्हिडिओ काढत होती. यानंतर दोघींही वर जाताता आणि काही वेळानंतर खाली येतात. खाली येताना दोघींपैकी एकजण परत बेल वाजवून दोघीं तिथून पळ काढतात.

संपूर्ण घटना मुंबई येथील जुहूमध्ये एका इमारतीमधील पहाटे अडीचच्या सुमारासची आहे तसेच इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये प्रकार कैद झाला असून सोशल प्लॅटफॉर्म एक्स(ट्वीटर)वरील@shreshtpoddar या पेजवर घटनेचे सीसीटीव्ही फुटे शेअर करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'लज्जास्पद या कृत्याबद्दल त्यांना पकडून दंड ठोठावला पाहिजे'तर अनेक यूजरने तरुणींच्या वागणूकीवर संताप व्यक्त केला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT