Mumbai Girl Dance Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Girl Dance Video: नाचता नाचता तरुणी पादचाऱ्याला धडकली; अतरंगी डान्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Mumbai Girl Dance Video: तरुणीचा रस्त्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai: सध्याच्या युगाला सोशल मीडियाचा काळ म्हटलं तरी नवल वाटणार नाही. जगभरातील लोकांकडून सोशल मीडिया अॅप्सचा वापर प्रचंड वाढला आहे. भारतीय लोकही यात मागे नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जात आहेत. अशीच एक तरुणी प्रसिद्धीसाठी तिच्या अतरंगी डान्सने नेटकऱ्यांना खदखदून हसवत असते. याच तरुणीचा रस्त्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सीमा कनोजिया ही तरुणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध आहे. सीमाचे अनेक अतरंगी डान्स व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. सीमा तिच्या अतरंगी डान्समुळे खूप प्रसिद्ध आहे. सीमा अतरंगी डान्सशिवाय अनेक ब्रँडचं प्रमोशन देखील करत असते.

सीमाचा अतरंगी डान्स

सीमाने याआधी लोकल ट्रेन, मेट्रोमध्येही डान्स केला आहे. तिला त्या ड्रान्समुळे ट्रोलिंगही सहन करावं लागलं होतं. त्यानंतर सीमाने थेट मुंबईतील रस्त्यावर डान्स केला आहे.

पावसामुळे मुंबईतील अनेक भागात खड्ड्यात पाणी साचलेले आहेत. अशा खड्डेमय रस्त्यावर सीमाने अतरंगी डान्स केला आहे. रस्त्यावर डान्स करता करता थेट एका पादचाऱ्याला धडकल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, तो पादचारी सावरत पुढे गेला. सीमाधडकली तरी तिचा डान्स सुरुच ठेवते. रस्त्यावरील अनेक जण तिचा डान्स पाहून चक्रावून पुढे जात आहेत. (Latest News)

सीमा झाली ट्रोल

सीमाने रस्त्यावरील अतरंगी डान्स (Dance Video इन्स्टाग्रामवरही तिच्या अकाऊंटवरून नेटकऱ्यांसाठी शेअर केला आहे. सीमाचा हा डान्स तुफान व्हायरल झाला आहे. सीमाचा डान्स पाहून अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी सीमाला ट्रोल देखील केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'नाचताना जरा मागे पुढे बघत जा '.

डान्स व्हिडिओवर शेकडो प्रतिक्रिया

तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'तू बरी आहेस ना?' असं म्हणत अनेक नेटकरी तिच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत आहे. सीमाच्या डान्स व्हिडिओवर शेकडो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत हजारो जणांनी सीमाचा अतरंगी डान्स पाहिला आहे. तर २२ हजारांहून अधिक जणांनी व्हिडिओ लाईक्स केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी कमेंट्स केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT