Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : उंदरानेच कुरतडला मांजरीचा कान; दोघांची जुगलबंदी कॅमेरॅत कैद, VIDEO व्हायरल

Mouse and Cat Viral Video : लहान लहान प्राणी सुद्धा साप, वाघ , सिंह अशा हिंस्र प्राण्यांना धडा शिकवतात. आताही असाच काहीसा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये उंदराने मांजरीला धडा शिकवल्याचं दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडियावर आजवर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. काही व्हिडिओमध्ये प्राण्यांची हाणामारी आणि जुगलबंदी पाहायला मिळते. प्राण्यांचे काही व्हिडिओ असेही असतात जिथे लहान लहान प्राणी सुद्धा साप, वाघ आणि सिंह अशा हिंस्र प्राण्यांना धडा शिकवतात. आताही असाच काहीसा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये उंदराने मांजरीला धडा शिकवल्याचं दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी उंदीर आणि मांजर यांच्यात जोरदार फायटींग सुरू असल्याचं दिसत आहे. एका व्यक्तीने त्यांची फायटींग आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मांजर उंदराला काहीच करत नाहीये. उलट उंदराने मांजरीच्या कानाला चावा घेतला आहे. उंदराचे दात किती धारधार आणि तिक्ष्ण असतात सर्वांनाच महिती आहे. त्यामुळे या मांजरीची मोठी बिकट अवस्था झालीये.

स्वात:ची सुटका करण्यासाठी मांजर धडपड करतेय आणि उंदरावर ओरडत आहे. मात्र तरिही उंदीर मामा काही मांजरीचा कान सोडायला तयार नाही. नेहमी मांजर उंदीर पकडताना दिसते. घरात जास्त उंदीर झाले की मांजरीला आणलं जातं. मात्र येथे उलट घडलं आहे. एका चिमुकल्या उंदराने भल्या मोठ्या मांजरीच्या नाकी नऊ आणले आहेत.

एका इंस्टाग्राम अकाउंटला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर लाखोंच्या घरात लाइक्स आणि व्हयुव्ज आल्याचं दिसत आहे. कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. एकाने टॉम अँड जेरी असंही कमेंटमध्ये म्हटलंय. तर आणखी काही कॅट लव्हर व्यक्तींनी मांजरीसाठी काळजी व्यक्त केली आहे.

असे व्हिडिओ काढण्यापेक्षा त्या मांजरीची मदत करा, असं काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. या आधी सिंह कासवाला घाबरल्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये सिंह तलावात पाणी पित असताना कासाव तेथे हालचाल करते. त्यामुळे सिंह चांगलाच डचकतो. हा व्हिडिओ देखील बराच व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT