Mosquito Coil  Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check : डासांना मारणाऱ्या कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

mosquito coil smoke side effects : आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची...तुम्ही घरामध्ये डास पळवण्यासाठी मॉस्किटो कॉईल लावत असाल तर सावध व्हा...कारण, मॉस्किटो कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं...चला पाहुयात.

Sandeep Chavan

मुंबई : तुम्ही घरामध्ये डास पळवण्यासाठी मॉस्किटो कॉईल लावत असाल तर सावधान...डास पळवता, पळवता तुम्ही आजारी पडाल असा खळबळजनक दावा करण्यात आलाय...मॉस्किटो कॉईल्स अनेकजण घरी लावतात...लहान मुलं, वृद्ध व्यक्ती घरी असल्याने या मॉस्किटो कॉईलचा धोका त्यांना अधिक असल्याचा दावा केल्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...मात्र, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, घरात डास वाढले की, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या आजारांचा धोका वाढतो. अशात जास्तीत जास्त लोक डास पळवून लावण्यासाठी घरात मॉस्किटो कॉईलचा वापर करतात. मात्र, कॉईलचा धूर तुम्हाला आजारी पाडू शकतो.

हा दावा गंभीर आहे. अनेकजण डासांपासून बचावासाठी मॉस्किटो कॉईल्स वापरतात. यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती एक्सपर्टकडून मिळू शकते...आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले...त्यांना हा व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

व्हायरल सत्य काय?

मॉस्किटो कॉईलचा धूर सिगारेटमधून निघणाऱ्या धुरा इतका घातक असतो

मॉस्किटो कॉईलमध्ये अनेक विषारी केमिकल्स असतात

कॉईलचा विषारी धूर फुफ्फुसाचं नुकसान करू शकतो

भविष्यात श्वास घेण्यासंबंधी समस्या वाढतात

कॉईलच्या धुरामुळे अनेकांना त्वचेची अॅलर्जी होते

त्यामुळे आमच्या पडताळणीत मॉस्किटो कॉईलमधून निघणाऱ्या धुरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय...तुम्ही जर मॉस्किटो कॉईल वापरत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या...नाहीतर डास पळवण्यासाठी लावलेल्या कॉईल्स तुम्हाला आजारी पाडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT