Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोब्राचा माकडाशी पंगा; 'रँचो'ने सापाला चांगलाच धडा शिकवला, पाहा मजेशीर VIDEO

Rohini Gudaghe

Animal Fight Video

प्राण्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. दोन प्राण्यांच्या हाणामारीला नेटकरी चांगलीच पसंती देताना दिसतात. एक माकड डायरेक्ट किंग कोब्राला भिडलं (Monkey Fight With King Cobra) आहे. त्यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये किंग कोब्रा माकडाची खोडी काढताना दिसत आहे. (Latest Marathi News)

किंग कोब्राचं नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. पण इथे तर माकडानेच कोब्राची (King Cobra) धोबीपछाड केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओला चांगली पसंती देताना दिसत आहे. खरं तर सर्वसामान्य लोकं किंग कोब्रापासून चार हात लांब राहणं पसंत करतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माकडाने घेतला कोब्रासोबत पंगा

हा व्हिडिओ @kashikyatra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ (Monkey) हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. किंग कोब्रा हा एक अत्यंत विषारी साप आहे. त्याच्या एका दंशातच व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याचं विष अतिशय घातक म्हणून ओळखलं जातं. जंगली प्राणी देखील कोब्राच्या वाट्याला जात नाही.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका माकडानं थेट किंग कोब्रासोबत पंगा घेतला (Animal Fight Video) आहे. कोब्रा फणा काढून उभा राहताच माकडाने त्याच्या डोक्यावर जोरदार टपल्या मारल्या आहेत. किंग कोब्राही गमतीने माकडाची खोडी काढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोन किंग कोब्रांनी एका माकडाला घेरल्याचं दिसतंय.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ते सारखा त्याला दंश करण्याचा प्रयत्न करत (viral video news) आहेत. परंतु कोब्रा जवळ येताच माकड त्यांना आपल्या हाताने फटके मारत आहे. दूर करत आहे. माकड अगदी सहजरित्या त्याचा हल्ला परतवून लावत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, शेवटी कोब्राने हार मारली अन् काढता पाय घेतला आहे.

या माकडाने किंग कोब्राची पळता भुई थोडी केली (viral news) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. माकड आणि सापाचा भांडण पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT