Mobile Blast Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! मोबाईल चार्जिंगला लावून गप्पा मारत होता, तितक्यात भीषण स्फोट झाला अन् .... पाहा VIDEO

Mobile Blast Video: फोनवर बोलताना या तरुणासोबत भयंकर घटना घडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Gangappa Pujari

Mobile Blast Viral Video:

मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलू नये.. असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा ही चुकच जीवावरही बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील हा तरुण मोबाईल चार्जिंगला लाऊन गप्पा मारत होता. याचवेळी मोबाईलचा भीषण स्फोट झाला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

मोबाईल हा सध्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांजवळ मोबाईल असतात तशी काळाची गरज आहे. मात्र मोबाईलचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेही आहेत. मोबाईलचा अतिरेक झाला की त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलणे, तासनतास मोबाईलवर गप्पा, रात्रभर मोबाईलला चार्जिंग लावल्याने (Mobile Blast) अनेक दुर्घटना झाल्याचेही समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलताना या तरुणासोबत भयंकर घटना घडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा तरुण मोबाईल चार्जिंगला लावून खुर्चीत बसून आरामात आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत होता. अचानक त्याच्या कानाजवळ असलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट झाला. स्फोट होताच तरुण पटकन खुर्चीवरुन उठून दुर पळाला. मात्र त्याच्या कानाला मोठी इजा झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्फोट होताच तरुणाने मोबाईल फेकून कान झटकायला सुरूवात केली.

व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अशा चुका न करण्याची विनंती कमेंटमध्ये केली आहे. दरम्यान, चार्जिंगदरम्यान मोबाईलचे तापमान वाढते. यामुळे मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हीही मोबाईल वापरताना अशा चुका टाळा. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT