Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : पाण्यात पोहण्यासाठी गेला, मासा समजून त्याने साप पकडला; पुढे जे घडलं ते भयंकरच...

Snake Video : सर्व मित्र साप साप म्हणून ओरडू लागतात. त्यावेळी तो आपल्याकडे हाताकडे पाहतो तर खरोखर आपण साप पकडला आहे ते त्याच्या लक्षात येतं. यावर तो फार घाबरतो आणि साप खाली फेकून देतो.

Ruchika Jadhav

Snake Shocking Video Viral :

अनेकदा मजा आणि मस्करीमध्ये व्यक्तीच्या हातून मोठ्या चुका घडतात. यातील काही घटना जीवावर बेतणाऱ्या देखील असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने मासा समजून थेट साप पडकला आहे. असे केल्याने या व्यक्तीसोबत पुढे भयंकर गोष्ट घडलीय.

आपल्या मित्रांनासोबत घेऊन हा व्यक्ती पोहण्यासाठी पाण्यात उतरला आहे. येथे आल्यावर काहीजण त्याचा व्हिडिओ बनवत आहेत. सदर व्यक्ती पाण्यात पोहत असताना अचानक त्याला मासे पकडवेत असं वाटतं. तो पाण्यात चाचपडतो आणि त्याच्या हाती काही तरी लागतं. आपल्याला भरपूर मोठा मासा सापडलाय असं त्याला वाटतं.

मासा हातून निसटून जाऊ नये म्हणून तो मासा आपल्या पोटाशी घट्ट धरून ठेवतो. तसेच पाण्याबाहेर पडण्यास सुरुवात करतो. आता या व्यक्तीने मासा नाही तर साप पकडला आहे. मात्र त्याला हे माहिती नसतं. त्यामुळे तो पटकन पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. बाहेर येताना लांबूनच त्याचे मित्र त्याला पाहतात. त्याने मासा नाही तर साप पकडला आहे हे त्यांना समजतं.

त्यानंतर सर्व मित्र साप साप म्हणून ओरडू लागतात. त्यावेळी तो आपल्याकडे हाताकडे पाहतो तर खरोखर आपण साप पकडला आहे ते त्याच्या लक्षात येतं. यावर तो फार घाबरतो आणि साप खाली फेकून देतो. साप बाजूला करत असताना सापाने त्याला वेटोळा घातलेला असतो. कशीबशी स्वतःची सुटका करून तो बाजूला होतो.

ही संपूर्ण घटना त्याच्या मित्रांनी आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. @rafiqcomedyshow या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. हा पाण्यातला साप आहे. पण्यातले साप विषारी नसतात असं अनेकांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT