Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune News: बापरे! दुसऱ्या मजल्यावरील पार्कींगमधून कार खाली कोसळली, थरारक व्हिडीओ व्हायरल

Car Parking Viral Video: सोशल मीडियावर सध्या पुणे शहरातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,ज्या व्हिडिओत पार्किंग करत असताना कार थेट भिंत फोडून खाली कोसळली आहे.पुढे काय घडते पहा.

Tanvi Pol

Pune Viral Video: पुणे शहरातून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका सोसायटीमधील गाडी पार्किंगमधून थेट खाली कोसळली आहे.घडलेली संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,संपूर्ण परिसर एका सोसायटीचा दिसत आहे.जिथे सोसायटीमधील अनेक मजली कार पार्किंग परिसर दिसत आहे.काही वेळाने शांत दिसणाऱ्या या व्हिडिओत पार्किंगमधून एक कार अचानक भिंत फोडून जोरदार खाली कोसळली जाते. कारचा आवाज ऐकून अनेकजण तिथे जमा होतात.सध्या पुणे(Pune) शहरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

कारच्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या 'saamtvnews'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''गाडी पार्किंगमधून खाली कोसळली,व्हिडिओ आला समोर''असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हायरल होत असलेल्या या अपघाताचे कारण रिव्हर्स घेताना अंदाज चुकलाचे सांगण्यात येत आहे,मात्र या घटनेवरुन वाहन चालवताना किती काळजी घेतली पाहिजे याचा अंदाज येईल.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बांधकाम किती भंगार आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''रिवस गाडी भारीच ड्रायव्हर''तर अजून एका यूजरने लिहिले,''गाडीला आतमध्ये गुदमरत होते म्हणून मोकळा श्वास घ्यायला आली'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : पुणे शहरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT