Mehndi Design On Head Saam TV
व्हायरल न्यूज

Mehndi Design On Head: हात-पाय सोडून थेट डोक्यावर काढली मेहंदी; टकलू महिलेचा VIDEO पाहिलात का?

Mehndi Design On Head Video: काही दिवसांपूर्वी मेहंदी ब्लाउजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता टक्कल असलेल्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

मेहंदी कुणाला आवडत नाही? कितीही मॉर्डन मुलगी असली तरी आपल्या लग्नात का होइना हातावर मेहंदी काढतेच. मुलींच्या सौंदर्यातील दागीण्यांपैकी मेहंदी देखील एक आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही मेहंदीच्या आजवर अनेक भन्नाट डिझाईन पाहिल्या असतील. मात्र सोशल मीडियावर सध्या एक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेहंदी हातांवर आणि पायांवर काढली जाते. काही अतरंगी मुली आजकाल टॅटू म्हणून मानेवर आणि कंबरेवर देखील मेहंदी काढतात. काही दिवसांपूर्वी मेहंदी ब्लाउजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता टक्कल असलेल्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेने हात, पाय सोडून थेट आपल्या डोक्यावर मेहंदी काढली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेहंदीची सुंदर डिझाईन या महिलेने आपल्या डोक्यावर काढली आहे. मेहंदी फार थंड असते मात्र तरीही या महिलेने थंड मेहंदी आपल्या डोक्यावर लावली आहे. संपूर्ण डोक्यावर कोयऱ्या आणि सुंदर फुलांची डिझाइन मेहंदीने काढलीये. @nurulalam576 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

बऱ्याचदा महिला आपले केस पांढरे असल्याने त्यांना रंग देण्यासाठी काळी किंवा लाल रंगाची मेहंदी लावतात. मात्र या महिलेने अशी हटके मेहंदी का लावली असेल याचं कारण समजू शकलेलं नाही. ३१ डिसेंबर रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय. नेटकऱ्यांनी यावर हस्स्यास्पद कमेंट केल्या आहेत.

देवा आता हेच पाहायचं राहिलं होतं, असं एका महिलेने कमेंटमध्ये लिहिलंय. तर आणखी एकाने कमेंटमध्ये महिलेला कॅन्सर झाल असावा आणि आनंदी राहण्यासाठी तिने असं केलं असावं असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

Amravati : पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास नकार, नातेवाईक संतप्त

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

SCROLL FOR NEXT