Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News : एकमेकींचे केस धरले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; २ महिला वकिलांचा भररस्त्यात राडा; पाहा VIDEO

Uttar Pradesh News : मथुरा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला वकिलांमध्ये जोरदार हाणामारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alisha Khedekar

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या एसएसपी कार्यालयाजवळ दोन महिला वकिलांमध्ये चेंबरवरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. महिला वकिलांमधील हाणामारी पाहून मोठ्या संख्येने लोक जमले. हा हाणामारीचा मुद्दा इतका तापला की घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये दिसणीऱ्या महिला वकिलांमध्ये चेंबरवरून आधीच वाद सुरू होता. हा वाद इतका वाढला की एका महिलेने दुसरीचे केस धरले आणि तिला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही हाणामारी झाली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांना लाथा आणि बुक्के मारताना दिसत आहेत. आणि या हाणामारीत आणखी एक महिलाही सहभागी असल्याचे दिसून येत आहे.ही संपूर्ण घटना नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली. घटनेदरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते, परंतु कोणीही हाणामारी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. सीओ सिटी भूषण वर्मा यांनी माध्यमांना सांगितले की,"मला या घटनेची माहिती मिळाली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. परंतु, अद्याप कोणत्याही महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. जर तक्रार आली तर चौकशीनंतर कारवाई केली जाईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Account Portability: अकाउंट नंबर तोच राहणार पण बँक बदलणार; RBI नवीन सुविधा करणार सुरु

Adhar Card : फक्त QR कोड स्कॅन करा; सेकंदात खरे अन् बनावट आधार कार्ड ओळखा, कसं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Pune: ड्युटीवर जातो म्हणत घराबाहेर गेले, फोनही बंद ठेवला अन् सीआरपीएफ जवान प्रशांत कदम यांचा अपघातात मृत्यू

Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

SCROLL FOR NEXT