Viral Video News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video News: 'पैलवान आला' गाण्यावर सयाजी शिंदेचा भन्नाट डान्स; जोश पाहून नेटकरी हैराण; पाहा VIDEO

Sayaji Shinde Dance Video: सोशल मीडियावर कायम मराठी कलाकारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र आताही एका मराठी कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक सिने कलाकारांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अशाच एका ज्येष्ठ कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो डान्स व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस हा व्हिडिओ आलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका घराबाहेरील शेड दिसून येत आहे. या शेडमध्ये एक झोपाला सुद्धा आहे ज्यावर एक व्यक्ती बसलेला आहे शिवाय त्यांच्या बाजूला अजून एक व्यक्ती आहे. आणि अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या समोर उभे आहेत. काही वेळात व्हिडिओ(Video) आणि गाण सुरु होत तसं सयाजी शिंदे हे ताल धरत आनंदाने डान्स करण्यास सुरुवात करतात. ''पैलवान आला'' या गाण्यावर सयाजी शिंदे यांनी तूफान डान्स (Dance) केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@hebaghbhava'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. एका दिवसापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओला तबल्ल ९ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर व्हिडिओला अजूनही मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे.

सोशल मीडियावर सयाजी शिंदे यांच्या संबंधित अनेक बातमी आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''माणसातला हिरो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की,''जबरदस्त'' तर एका पेक्षा अनेक यूजर्संनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT