Dog Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dog Viral Video: कुत्र्याच्या 'अ‍ॅक्टिंग'ने 'व्हिलन' अटकेत; बदमाशाचा किडनॅपिंगचा प्रयत्न फसला, थरारक Video समोर

Pet Dog Viral Video: कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुत्र्याने आपल्या मालकाच्या मुलीला किडन्याप करण्यासाठी आलेला चोराचा फडशा पाडला आहे

Rohini Gudaghe

Marathi Viral Video News

मानव आणि पाळीव कुत्र्यांमध्ये नेहमीच खूप चांगले संबंध राहिले आहेत. बरेच लोक त्यांच्या घरात कुत्रे पाळतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे कुत्र्यांवर प्रेम करतात. त्या बदल्यात कुत्रेही (Dog) त्यांच्या मालकासाठी आणि कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात. मालकाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर कोणतीही संकटे आली तर कुत्रा आपली निष्ठा दाखवतो आणि आपला जीव देण्यासही मागे हटत नाही.  (Latest Marathi News)

हल्ली सोशल मीडियावर असाच एक हृदय जिंकणारा व्हिडिओ व्हायरल होत (Dog Viral Video) आहे. ज्यामध्ये एक माणूस बंदुकीचा धाक दाखवून मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न (Kidnap Girl) करतो, पण कुत्रा आपल्या शहाणपणाने आणि हुशारीने आपल्या मालकाच्या मुलीला सोडवतो.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुत्र्याचा व्हायरल व्हिडिओ

कुत्र्याच्या निष्ठेशी संबंधित अनेक गोष्टी आपण ऐकतो. परंतु आता ही घटना प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पाळीव कुत्रा माणसाप्रमाणे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून मुलीचं अपहरण होण्यापासून (Dog Video) वाचवतो.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्र्याने मेल्याचं भासवून मुलीचा जीव तर वाचवला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. मात्र एक बदमाश अचानक बंदुक घेऊन घरात (viral news) घुसतो. यामुळे मुलगी घाबरते. नंतर धक्कादायक घटना घडते, या परिस्थितीत त्यांच्या पाळीव कुत्र्याने जे केले, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कुत्रा त्या बदमाशाला मूर्ख बनवण्यासाठी मेल्याचं नाटक करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र चोर मुलीला पकडण्याचा प्रयत्न करताच कुत्रा लगेच उठतो. त्याचा हात आपल्या जबड्यात पकडतो आणि मुलीला सोडवतो. सोशल मीडियावर लोकं कुत्र्याच्या या बुद्धिमत्तेचं कौतुक करत (latest viral video) आहेत.

हा व्हिडिओ THE ANIMAL EMPIRE नावाच्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला ८.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे - हा अतिशय हुशार कुत्रा आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे - कुत्र्याने आपले कर्तव्य चोख बजावले आहे, तर तिसऱ्याने लिहिले आहे - या कुत्र्याला प्रशिक्षण दिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT