Viral News Yandex
व्हायरल न्यूज

Viral News: सिगरेट सोडण्यासाठी माणसाचा अतरंगी उपाय, डोकं पिंजऱ्यात बंद करून बायकोकडे दिली चावी, पाहा व्हायरल पोस्ट

Viral News: धुम्रपान सोडण्यासाठी एका व्यक्तीनं अनोखा उपाय शोधला. डोकं थेट पिंजऱ्यात बंद केलं. हा विचित्र जुगाड पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. हा प्रयोग खरोखरच चर्चेचा विषय ठरला आहे.

Dhanshri Shintre

सिगरेट पिणं शरीरासाठी किती हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. सिगारेटमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात, शिवाय डिप्रेशनसारख्या मानसिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ नेहमी धुम्रपानापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. तरीही, ही माहिती असूनही अनेक जण सिगारेटच्या व्यसनाचे शिकार होतात. धुम्रपान सोडणं कठीण असलं तरी आरोग्यासाठी त्याचा त्याग करणे अत्यावश्यक आहे, हे स्पष्टपणे सांगणारा हा संदेश आहे.

इब्राहिम युसेल हा माणूस जवळपास ३० वर्षे सिगरेट पिऊन आपल्या आरोग्याशी खेळत होते. त्यांच्या पत्नीच्या मते, ते दररोज ४० सिगरेट फुंकतात, ज्यामुळे त्यांच्या छातीवर गंभीर परिणाम झाले होते आणि श्वसनाशी संबंधित समस्या सुरू झाल्या होत्या. सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांचा व्यसन सुटत नव्हता. अखेर, त्यांनी अत्यंत विचित्र निर्णय घेत, आपलं डोकं एका पिंजऱ्यात बंद करून सिगरेट सोडण्याचा प्रयत्न केला. हे नक्कीच एक आश्चर्यकारक उपाय होता.

इब्राहिम युसेल यांनी सिगरेट सोडण्यासाठी एक अनोखा पिंजरा तयार केला. त्यात अत्यंत बारीक तारे होत्या, ज्यामुळे सिगरेटची काडीही आत जाऊ शकत नव्हती. तलप आल्यावर सिगरेट न ओढता राहावे, म्हणून त्यांनी पिंजऱ्याची चावी त्यांच्या पत्नीला दिली होती. हे एक विचित्र पण प्रभावी उपाय होते.

इब्राहिम युसेल यांनी सिगरेट सोडण्यासाठी एक अनोखा उपाय शोधला. त्यांच्या डोक्यावर एक पिंजरा बंद करून ठेवण्यात आला, ज्यात सिगरेटची काडीही प्रवेश करू शकत नव्हती. बायकोने फक्त जेवणाच्या वेळीच पिंजरा उघडयचा, बाकी वेळ डोकं पिंजऱ्यातच राहिल. या विचित्र उपायामुळे त्यांची सिगरेट पिण्याची इच्छाही हळूहळू कमी झाली. एक वर्षाच्या कठीण तपस्येनंतर त्यांनी अखेर सिगरेट सोडण्यास यश मिळवले. या प्रयोगाची सुरुवात २०१३ साली झाली होती, तेव्हा ते ४२ वर्षांचे होते. हे सिगरेट सोडण्यासाठीचा अत्यंत विचित्र आणि प्रभावी उपाय ठरला. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT