Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: ऑफिसमध्ये झोपल्यावर बॉसने पकडलं तर काय करायचं? पठ्ठ्याने सांगितला प्लान B, जुगडू VIDEO व्हायरल

Sleeping in Office Viral Video: ऑफिस टाईममध्ये आपल्याला कोणी झोपलेलं पाहिलं तर चांगलीच गोची होते. असंच काहीसं या तरुणासोबत घडलं. मात्र झोपण्या आधीच आपल्याला पकडल्यावर काय करायचं यासाठी त्याने प्लान बी रेडी ठेवला होता.

Ruchika Jadhav

Sleeping in Office Trick:

ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींची रोजची मोठी धावपळ होते. अनेकवेळा झोप पूर्ण होत नाही त्यामुळे ऑफिसमध्ये काहीजण हमखास झोपतात. अशात ऑफिसमध्ये डुलकी लागली आणि बॉसने पकडलं तर? अशावेळी काय करावं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बऱ्याच व्यक्तींना दुपारच्या जेवणानंतर जरा डुलकी लागते. कितीही काहीही झालं तरी थोडं झोपावं वाटतं. मात्र ऑफिस टाईममध्ये आपल्याला कोणी झोपलेलं पाहिलं तर चांगलीच गोची होते. असंच काहीसं या तरुणासोबत घडलं. मात्र झोपण्याआधीच आपल्याला पकडल्यावर काय करायचं यासाठी त्याने प्लान बी रेडी ठेवला होता.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण ऑफिसमध्ये झोपला तितक्यात त्याचा बॉस तेथे आला. तरुणाला झोपलेलं पाहून बॉस रागवला आणि त्याला उठवू लागला. आता आपल्या कुणीतरी उठवतंय असं समजल्यावर तरुण खाडकन जागा झाला नाही. त्याने डोळे बंद ठेवले आणि हाताने थांबा थांबा असं खूनवलं.

त्यानंतर डोळे उघडून त्याने देवाला नमस्कार केला. जणू काही तो झोपलेला नव्हता तर डोळे बंद करून देवासाठी प्रार्थना करत होता असं नाटक या तरुणाने केलं. त्याने असं केल्यावर बॉस देखील काहीच बोलू शकला नाही आणि तेथून निघून गेला. तरुणाच्या या भन्नाट 'प्लान बी'चा व्हिडीओ त्याच्या एका मित्राने आपल्या फोनमध्ये कैद केलाय.

@comedy.jokesofficoal या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाखोंच्या घरात लाइक्स आलेत. तसेच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. तरुणांना हा भान्नाट जुगाड फार आवडला आहे. ऑफिसमध्ये झोपण्यासाठी अनेक ट्रिक्स पहिल्या मात्र या ट्रिकला कसलीच तोड नाही अशी कमेंट एका युजरणे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT