Mumbai local women coach incident google
व्हायरल न्यूज

Mumbai Local: धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये महिला डब्यात बुरखा घालून पुरुष शिरला, नंतर काय घडलं? पाहा व्हिडीओ

Viral Video: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात बुरखा घालून पुरुष शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईची लाईफलाईन ही सगळ्यांच्याच सोयीची आहे. दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. त्यामुळे या ट्रेनला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यात महिलांचे लोकल डबे हे असुरक्षित असल्याचे म्हंटले जात आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलांच्या डब्यात एक थरारक प्रकार घडला. पुढील लेखात आपण याबद्दल संपूर्ण माहिती आणि पोलीसांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक माणूस बुरखा घालून लोकल ट्रेनमध्ये चढला होता. एका तरुणीने त्याचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामध्ये तरुणींनी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब सांगितली. तरुणींच्या बोलण्यात खूप भीती दिसत होती.

कारण तो पुरुष आधी डब्यात चढला आणि इतर महिलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. महिलांना जेव्हा पुरुष बुरखा घालून आल्याचं कळालं तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. त्याला ट्रेन मधून उतरण्यास सांगितलं, परंतु तो डब्यातून खाली उतरला नाही. यामुळे डब्यात भीती आणि गोंधळ निर्माण झाली होती. काही महिलांनी सांगितलं की, हा माणूस चोरी करण्याच्या उद्देशाने डब्यात आला होता.

लोकल मधल्या महिलांनी घाटकोपर येथील पोलिसांकडे तक्रार केली. पण तो पर्यंत हा व्यक्ती फरार झाला होता. पोलीसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आणि लगेचच तपास सुरु केला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, '' ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ च्या सुमारास एक व्यक्ती बुरखा घालून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन येथून महिलांच्या डब्यात चढला.

तपास करेपर्यंत सदर इसमाने रेल्वेतून उडी मारून दुसऱ्या बाजूस असलेल्या कर्जत गाडीमध्ये जाऊन इसम फरार झाला. मात्र सर्व रेल्वे स्थानकावर याची नोंद केली असता अजूनही सदर इसम फरार असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही अंतर्गत आरोपीचा शोध सुरू आहे असं पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT