Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : शेवटी बाप तो बापच असतो; पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेत दरवाजाजवळ बसून केलं जेवण, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Man Eating Tiffin In Mumbai Local Video : भूक काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या व्यक्तीने थेट रेल्वेच्या डब्यातच खाली बसून आपलं जेवण केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.

Ruchika Jadhav

Father Struggle Emotional Video :

आपल्या मुलांना काही होऊनये त्यांना हवं नको ते सर्व काही बघावं यासाठी आई कायम घरात आणि मुलांच्या अवतीभोवती असते. मात्र आई हे सर्व काही बाबांमुळे करू शकते. बाबा रोज घराबाहेर पडून पैसे कमवून आणतात त्यामुळे मुलांना हव्या नको त्या सर्व गोष्टी पुरवता येतात. सध्या सोशल मीडियावर वडिलांचं प्रेम आणि त्यांची धडपड दाखवणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवास करत आहे. प्रवास आणि कामाच्या व्यापात या व्यक्तीला दोन घास खाण्यासाठी देखील वेळ नाही. मात्र भूक काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या व्यक्तीने थेट रेल्वेच्या डब्यातच खाली बसून आपलं जेवण केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा बसण्यासाठी सीट मिळत नाही. सीट नसल्याने बराच वेळ उभं रहावं लागतं. काहीवेळा तर 1 ते 2 तास देखील उभे राहून प्रवास करावा लागतो. आता या व्यक्तीला देखील ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट मिळालं नाही. उभे राहून राहून पाय दुखू लागले. त्यामुळे त्यांनी थेट दरवाजा जवळ असलेल्या जागेत मांडी घालून बसण्याचा निर्णय घतेला.

तिथेच बसून त्यांनी घरून दिलेला डब्बा उघडला आणि घाई घाईने सर्व पदार्थ फस्त केले. आता हे सगळ हा व्यक्ती आपल्या मुलांसाठीच करत असणार. बाप त्याची माया, प्रेम आणि कष्ट या सर्व गोष्टी या एका व्हिडीओतील प्रसंगावरून समजत आहेत. प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मुलांचे बालपण, शिक्षण आणि लग्न इथपर्यंत काम करतात आणि मुलांना सर्व गोष्टी पुरवतात.

मात्र बऱ्याच ठिकाणी मुलं आपल्या वडिलांचा अनादर करतात. तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं? असे प्रश्न विचारतात. एव्हढी मेहनत घेणाऱ्या बापाला त्यांची मुलं मोठे झाल्यावर असे प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना फार मोठ्या असतात.

सोशल मीडियावर @shreee_shiiv या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत सादर व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. यावर अनेक वडिलांनी आणि मुलांनी छान कमेंट करत मनातल्या भावना व्यक्त केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT