Man Dies On The Spot Due to Heart Attack Marriage At Pakistan Video Goes Viral on Social Media  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नातचं मृत्यूने गाठलं! नवरदेवाला हार्ट अटॅक, अवघ्या काही सेकंदात मृत्यू; थरारक VIDEO

Heart Attack Viral Video: लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात लगीनघाई सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

Gangappa Pujari

Heart Attack Viral Video:

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात लगीनघाई सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

हल्ली हार्ट अटॅकचे (Heart Attack) प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी जीममध्ये व्यायाम करताना, कधी खाता- पिताना, डान्स करताना सहज चालता बोलता हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना ऐकायला मिळत आहेत. पाकिस्तानमधून (Pakistan) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकीकडे घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हार्ट अटॅक आला अन् काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हा व्हिडिओ सियालकोटच्या डस्का भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, वधू-वर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला कुटुंबीयही बसलेय. घरात आनंदी वातावरण आहे आणि सर्वजण हसत-हसत आहेत. अचानक सोफ्यावर बसलेला नवरदेव खाली कोसळतो. सुरुवातीला घरच्यांना काहीच समजत नाही.

मग एकजण त्याला उचलून त्याची तपासणीही करतो. मात्र अवघ्या काही क्षणात त्याचा मृत्यू होतो. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने वराचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. याबाबत कुटुंबीयांनी कोणतीही चौकशी किंवा तक्रार करण्यास नकार दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT