Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : हसावं की चिडावं! तरुणाचा हा आगाऊपणा बघा! जीवावर उदार होऊन पुराच्या पाण्यातून चालत निघाला, अन्...!

Raigad Rain : दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती असताना त्या पुरातून वाट काढत नदीवरील पुल पार करताना एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

रायगड जिल्ह्यात काल भरपूर पाऊस कोसळला. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आता अनेक घरांमध्ये शिरलेलं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय. मात्र दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती असताना त्या पुरातून वाट काढत नदीवरील पुल पार करताना एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महाड तालुक्यातील सांदोशी येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील पुल देखील पाण्याखाली गेला असून पुल कुठे आणि नदी कुठे अशी स्थिती झाली आहे. दुथडी भरून पुलावरून नदीचे पाणी वहात असताना त्यातून अतिशय धोकादायकरीत्या एक व्यक्ती वाहत्या पाण्यातून पुलावरून नदी पार करत आहे.

नदी पलीकडे या व्यक्तीचे काही मित्र उभे आहेत. त्यांनी या पठ्ठ्याने केलेला प्रताप आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओ काढत असताना सर्वजण या व्यक्तीला नदी पार करू नको असं ओरडून ओरडून सांगत आहेत. मात्र तरीही तो कुणाचं ऐकत नाही. पुलावरून स्वत:ला बॅलेन्स करत त्याने संपूर्ण पूल पार केला आहे.

हा पुल पार करताना त्याची थोडी जरी चूक झाली असती तरी होत्याचं नव्हतं झालं असतं. कारण नदी कुठे आणि पुल कुठे हे डोळ्यांनी पाहून सांगणे शक्यच नव्हते. पुलाऐवजी या व्यक्तीचा पाय फक्त पाण्यात पडला असता तर तो वाहून जाण्याची भीती होती. अशी परिस्थिती असूनही त्याने पुल पार केला आहे.

आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रशासनाने देखील यावर नागरिकांना धोकादायक स्थितीत नदी किंवा पुल पार करण्याचा धोका पत्करू नका, असं आवाहन केलं आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने धबधबा किंवा नदीपात्रात जीवघेणे स्टंट करणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT