Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महाकुंभला जाण्यासाठी गर्दी, बक्सर स्थानकावर पाय ठेवायला जागा नाही, प्रवाशांमध्ये झटापट अन् हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी प्रवाशांनी उडवलेला गोंधळ पाहण्यासाठी मिळत आहे.

Tanvi Pol

Mahakumbh Video: गेल्या काही महिन्यांपासून जगभरात महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरु आहे.अनेक वर्षानंतर भरलेल्या या महाकुंभामध्ये देशातील नाही तर जगभरातील प्रत्येक सामान्य नागरिकांपासून ते कोट्यधीक्ष लोकांनी भेट दिली आहे,मात्र आता महाकुंभाला जाणे जीवावर बेतत असल्याचे समारे येत आहे.नागरिक आपला जीव धोक्यात टाकून महाकुंभाला जात आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे,ज्यात धोकादायक प्रवास करुन ते महाकुंभाला पोहचत आहेत.येत्या शनिवारी रात्री दिल्लीमध्ये अतिशय दुर्देवी अशी घटना घडली आहे.ज्यात महाकुंभला जाण्याआधी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी प्रवाशांची मोठी चेंगराचेंगरी झाली,ज्यात तब्बल १८ जणांचा मृत्यू झालेला आहे.मात्र त्यानंतर सोशल मीडियीवर बक्सर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडिओ (Video) व्हायरल झालेला आहे.ज्यात महाकुंभला जाण्यासाठी प्रवाशी ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठी हातापायीही करत होते.

बस्कर रेल्वे स्थानकावरील भीषण दृश्यांचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सच्या FirstBiharJharkhand या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण सांगण्यात आलेले आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

बस्कर स्थानकावरील(Station) व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''काय गरज'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''काळजी घ्या सर्वांनी''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत,तर काही यूजर्संनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT