Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: महाकुंभाचा कालावधी वाढणार, शाहीस्नान करण्यासाठी आणखी वेळ मिळणार, काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mahakumbh Mela Duration: सोशल मीडियावर सध्या महाकुंभ मेळ्याबाबत एक मॅसेज व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या या मॅसेजमध्ये नक्की काय आहे ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेली बातमी वाचाच.

Tanvi Pol

Mahakumbh Mela 2025: तुम्ही महाकुंभमेळ्यात जाण्याचा प्लॅन करताय का...? कारण महाकुंभमेळा बरेच दिवस सुरू राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय.मात्र, हा दावा खरा आहे का...? कुंभमेळा किती दिवस आहे ते पाहुयात.

महाकुंभमेळ्यात(Mahakumbh Mela) जात असाल तर आता काळजी करायला नको.कारण, महाकुंभमेळ्याची तारीख वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहुयात

महाकुंभाचा कालावधी वाढणार आहे. त्यामुळे भाविकांनी आता महाकुंभात शाहीस्नान करण्यासाठी आणखी वेळ मिळणार.असा मेसेज व्हायरल होत असल्याने महाकुंभमेळ्यात जाणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय.कारण, ज्यांना आता जाणं शक्य नाही त्यांना पुढे जाणं शक्य होईल.आतापर्यंत किती भाविक महाकुंभात सहभागी झाले पाहुयात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाकुंभात जाऊन स्नान केलं

मात्र, खरंच महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढवण्यात आलाय का...? शेवटचं स्नान महाशिवरात्रीदिवशी होणार आहे.मग अचानक कालावधी का वाढवला...? हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे,त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.आमच्या व्हायरल सत्य टीमने महाकुंभमेळ्यासंदर्भात अधिक माहिती मिळवली,त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

महाकुंभाचा कालावधी वाढवला जाणार नाहीये,त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास (Faith)ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय,तुम्हाला जर महाकुंभात जायचं असेल तर शेवटचं स्नान हे २६ फेब्रुवारीलाच होणार आहे,त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढणार असल्याचा दावा असत्य ठरला.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT