Women Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Women Fight Video: बापरे! पाण्याच्या वादातून महिलांची चांगलीच झटापट; एकमेकींना धु धु धूतलं; व्हिडिओ व्हायरल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये झालेली हाणामारी पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. नक्की काय घडले पुढे ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Madhya Pradesh News: पाणी हे जीवनाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे, पण त्याच्या अभावामुळे अनेकदा वादही उद्भवत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना राज्यातील एका भागात घडली आहे, जिथे पाण्याच्या कारणावरुन काही महिलांमध्ये थेट हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेली ही घटना मध्य प्रदेशमधील असल्याचे समोर आले आहेत. त्यात घडले असे की,मध्य प्रदेशमधील एका भागात पाण्याच्या कारणावरुन काही महिलांमध्ये वाद निर्माण झाले. पाहता पाहता हा वाद अनेक महिलांच्या भांडणाचा विषय झाला. अनेकवेळ सुरु असलेला हा वाद थेट हाणामारीत(Fighting) बदलतो. त्याच भागातील एका व्यक्तीने लपून सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या घटनेच्या व्हिडिओला(Video) सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काहींनी या घटनेवर विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,''ऐवढं काय मारायच महिलांनी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नेहमीच असतं हे'' तर काहींनी अशा केलेल्या वर्तणामुळे संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील dailynewsbundelkhand या अकाउंटवर अपलोड केलेला आहे. त्यानंतर काही तासांतच या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत. इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ फेसबूक, ट्वीटर अशा अनेक माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT