Saam Tv
व्हायरल न्यूज

पोलिस ठाण्याच्या बाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; एकमेकांना रस्त्यावर पाडून धु धु धुतले

Boyfriend Girlfriend Fight: सोशल मीडियावर वारंवार अनेक कपल्सच्या वादविवादाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पण सध्याचा व्हायरल झालेला हा व्हिडिओही तसाच काहीसा आहे. पण यात नेमके काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Couple Street Fight Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये थेट पोलिस ठाण्याच्या बाहेरच तुफान वाद झाला आहे. इतकंच नाही तर हा वाद हाणामारीपर्यंत गेला असून, रस्त्यावर लोकांसमोर दोघे एकमेकांना पाडून धोपटताना दिसत आहेत.

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा पोलिस ठाण्याबाहेरच तमाशा

ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरातील पोलिस ठाण्याच्या बाहेर घडली असून, त्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी जोरजोरात एकमेकांवर ओरडताना दिसत आहेत. काही वेळातच दोघांत धक्काबुक्की सुरू होते आणि गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडवर हात उगारते. त्यानंतर बॉयफ्रेंडही संतापून तिला ढकलतो आणि मग सुरू होते जोरदार मारहाण.

घटनास्थळी काही क्षणांतच बघ्यांची गर्दी जमते. लोक मोबाइलमध्ये व्हिडीओ काढू लागतात, काहीजण मधे पडून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात, तर काही केवळ तमाशा पाहत उभे राहतात. यावेळी काहीजणांनी पोलिसांना बोलावलं आणि पोलिस घटनास्थळी पोहोचून या दोघांना वेगळं केलं आहे.

सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ (Video) एक्सवरील Bharat Samachar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''दोघांना पकडून मारल पाहिजे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आमच्या भागात का असं घडत नाही'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या दिसून येत आहेत.

टीप: तरुण- तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

SCROLL FOR NEXT