Fact Check Video x
व्हायरल न्यूज

Viral : समुद्रात सापडली भगवान विष्णूची मूर्ती? 5 हजार वर्षे जुनी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी?

Fact Check : तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीची भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडलीय...ही मूर्ती पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर भक्तांची अलोट गर्दी उसळलीय...नेमकं या मूर्तीमागचं काय आहे व्हायरल सत्य...पाहूयात...

Yash Shirke

व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल... कारण, भगवान विष्णूची मूर्ती सापडलीय असा दावा करण्यात आलाय.. व्हिडिओत भली मोठी मूर्ती दिसतेय.. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलंय... खरंच एवढी मोठी विष्णूची मूर्ती सापडलीय का...?

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याने आम्हालाही याची उत्सुकता होती की खरंच मूर्ती सापडलीय का...? एवढी मोठी मूर्ती सापडली तर आता कुठे ठेवण्यात आलीय...? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले... या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली... त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

समुद्रात खोलवर एक मूर्ती दिसत आहे. हिंदू धर्मातील भगवान विष्णूची शेषशय्येवर विराजमान असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटाजवळ समुद्रात ब्रिटन, इंडोनेशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधन पथकाला सापडलीय. मूर्ती 5 हजार वर्षांहून अधिक जुनी आहे.

व्हायरल मेसेजमध्ये ही मूर्ती 5 हजार वर्ष जुनी असल्याचा दावा केलाय... आणि मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटाजवळ सापडलीय असं सांगितलंय... त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने काही आंतरराष्ट्रीय पेपर्स पाहिले... कुठेही याबाबत बातमी सापडली नाही... त्यामुळे या व्हिडिओचा आणखी तपास केला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

साम इन्व्हिस्टिगेशन

- भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडलेली नाही

- व्हायरल व्हिडिओ 11 एप्रिल 2025 रोजी पोस्ट केलाय

- AI तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवलाय

- दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केलाय

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अशा खोट्या दाव्यांपासून सावध राहा. व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी झाल्याशिवाय शेअर करू नका... आमच्या पडताळणीत समुद्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे तीळ पिकाचे नुकसान

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT