Viral VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

चिमुकला कारच्या हॉर्नवर थिरकला, सोशल मीडियावर गोंडस व्हिडिओ व्हायरल

Kid Dance Viral Video: डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक व्हायरल झालेले आहेत. पण सध्या एका चिमुकल्याचा अत्यंत गोड असा डान्स व्हिडिओ खुप चर्चेत आलेला आहे. तुम्हीही एकदा हा डान्स व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Viral Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुकला कारच्या हॉर्नवर थिरकत असल्याचं पाहायला मिळतं. हा गोंडस आणि मनमोहक व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी त्याच्या क्युटनेसवर फिदा झाले आहेत. कारच्या हॉर्नचा आवाज म्हणजेच चिमुकल्याचा डान्स बीट असल्यासारखं दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत.

व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये दिसतं की, एक लहानसा मुलगा गाडीच्या बाजूला उभा आहे. कोणी तरी कारचा हॉर्न वाजवतं आणि लगेचच हा चिमुकला डान्स करायला लागतो. हॉर्न वाजवल्यावर तो वेगवेगळ्या पोज देत, हातवारे करत, अगदी स्टाईलमध्ये थिरकत असतो. हा नजारा पाहून कोणताही प्रेक्षक आपल्या चेहऱ्यावर हसू न लावता राहू शकत नाही.

गोंडस भाव आणि जबरदस्त एनर्जी!

चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याचे डान्स(Dance) स्टेप्स आणि त्याचा आत्मविश्वास हे सर्व पाहून लोक भारावून गेले आहेत. त्याच्या डान्समध्ये निरागसता आहे, पण त्याचवेळी त्याची शैली आणि आत्मविश्वास देखील लक्षवेधी आहे. विशेष म्हणजे तो जेव्हा हॉर्न ऐकतो, तेव्हा तो लगेच एका कलाकारासारखा सादरीकरण करत असल्याचं वाटतं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच क्षणात व्हायरल झाला असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील sarbas_aero_या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काहींनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर केला, स्टोरीजमध्ये पोस्ट केला. यावर हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT