Ulhasnagar Crime Saam Tv
व्हायरल न्यूज

Ulhasnagar Crime: मोबाईल डिस्प्लेवरुन तुफान राडा; तिघांनी मिळून दुकानदाराला केली बेदम मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Shocking Incident: सोशल मीडियावर सध्या उल्हासनगरमध्ये घडलेल्या एका भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Crime Caught On Camera: मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या दुकानावर अंधधुंद दगडफेक करत मोबाईल दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नीरज यादव असं मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे, नीरज याच्याकडे मोबाईल डिस्प्ले बनविण्यासाठी तीन तरुण आले. त्यांना १५०० रू खर्च लागेल असं सांगितलं. पुन्हा ते ५ ते १० मिनिटाने दुकानात येऊन वाढीव किंमत का सांगितले यावरून वाद(Fight) घातला.

यावेळी त्या तीन तरुणांनी थेट कंबरेला लावलेला पट्ट्या ने नीरज याला बेदम मारहाण केली. एवढं चं नाही तर दुकानाबाहेर येऊन अंधधून दगडफेक करून संपूर्ण दुकानाची नासधूस केलीय ,ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत,

सध्या सर्व प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral) होत असून इन्स्टाग्राम, एक्स, फेसबूक अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर केला गेला आहे. नुकताच संपूर्ण घटना इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर पाहण्यासाठी मिळत आहे. घटना पाहताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT