Leopard Attack Video Saam Tv
व्हायरल न्यूज

बिबट्या दबक्या पावलांनी शिरला गोठ्यात, शिकारीवर झडप टाकणार तेवढ्यात शेतकऱ्याने शिकवला धडा

Leopard Attack Video: महाराष्ट्रातील एका गावात रात्री बिबट्याने पाळीव जनावरांच्या गोठ्यात शिरताच शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत बिबट्याला हुसकावून लावले. थरारक क्षण सीसीटीव्हीत कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

Tanvi Pol

Ambegaon Shocking Video: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे गावात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी थेट पाळीव जनावरांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने गावात खळबळ उडवली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ही घटना सुखदेव शेटे यांच्या घरासमोर घडली. रात्रीच्या वेळेस सुमारे दोन बिबटे(leopards) गावात शिरले होते. विशेष म्हणजे या दोन बिबट्यांपैकी एकाने गोठ्याबाहेर पहारा दिला, तर दुसरा बिबट थेट गोठ्यात शिरून पाळीव जनावरांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. बिबट्यांची ही शिकारीची तयारी इतकी दबक्या पावलांनी झाली की काही क्षणांकरिता कोणालाही कल्पना आली नाही. मात्र, शेतकरी सुखदेव शेटे यांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येताच त्यांनी झोपेतून जाग येऊन बाहेर डोकावले, तेव्हा गोठ्यातील विचित्र हालचाल त्यांच्या नजरेस पडली.

गावातील नागरिकांनीही ही संपूर्ण घटना पाहून मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून वडगाव काशिंबे परिसरात बिबट्यांची हालचाल सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. मात्र, या थरारक घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुखदेव शेटे यांचे घर हे गावाच्या बाहेर, शिवारात असल्यामुळे बिबट्यांचा धोका अधिक आहे.

या घटनेनंतर शेतकरी वर्गातून वनविभागाकडे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा भविष्यात एखाद्या माणसाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT