Latur Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Latur Video: टवाळखोरांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Student Beaten Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्हाला महाविद्यालयीन विद्यार्थी दिसून येत आहे. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

College Students Attacked: लातूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या टवळखोरांकडून मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दरम्यान ही सगळी मारहाणची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीतीच वातावरण निर्माण झालं.

सीसीटीव्ही व्हिडिओत दिसलेली मारहाण

सीसीटीव्ही(CCTV) फुटेजमध्ये दिसते की,एका दुकानाबाहेर महाविद्यालयीन तरुण थांबलेले आहेत आणि त्याज जागी टवळखोरही आहेत. दरम्यान काही कारणावरुन दोन गटात वाद सुरु होतात. पाहता पाहता हा वाद काही वेळात तुफान हाणामारीत बदलतो. मात्र ही हाणामारी टवाळखोरांकडून महाविद्यालयीन तरुणांना होते. सर्व घटना दुकानाबाहेरील असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घडलेली ही घटना लातूरच्या रेनापुर येथे घडली असून सध्या हा प्रकार सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येक शहरातील नागरिकाने पाहिला असून त्यावर अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

ही मारहाणची(Fighting) घटना समजल्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बरेच विद्यार्थी आता रेणापुर परिसरातील रस्त्यांनी येणे-जाणे टाळत आहेत. "आम्हाला आता कॉलेजला येणे आणि जाणे धोकादायक वाटू लागले आहे," अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांनी दिली. तक काही विद्यार्थ्यांनी या प्रकारासाठी पोलिसांची कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT