Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कंडक्टरचा विकृतपणा! धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेशी गैरवर्तन; संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद

Mangalore Bus Incident: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक महिला प्रवास करताना अत्यंत सावधगिरीने प्रवास करेल. असे काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Shocking Video: बंगळुरूमध्ये एका धावत्या बसमध्ये घडलेला संतापजनक प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा आधार मानल्या जाणाऱ्या बसमध्ये एका कंडक्टरने महिला प्रवाशाशी केलेल्या गैरवर्तनाचा प्रकार समोर आला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळुरूमधील एका मुख्य मार्गावर धावत असलेल्या बसमध्ये घडली आहे. ही घटना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये कंटक्टरने झोपेत असलेल्या महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करताना स्पष्टरित्या दिसत आहे. त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाने (Passenger) सर्व प्रकार चित्रित केला आहे.

घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील fem.social या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर घडलेल्या घटनेचे सविस्तर कारण दिलेले आहेत. एका दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर होताच लाखो लोकांनी पाहिला असून फेसबूक, ट्वीटर आणि अन्य माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.

हे प्रकरण व्हायरल(Viral) होताच पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली असता या कंटक्टरवर एफआयआर दाखल करण्यात आली असून १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. त्यातील काहींनी कमेंटमध्ये, चांगलीच अद्दल घडवा''असे म्हटलं आहे तर काहींनी,''सुटका झालीच नाही पाहिजे असं करा'' अशा अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: बसमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT