Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : अरेच्चा! टीव्ही, फ्रिजनंतर पंख्यासाठी कव्हर; मीशोच्या हटके प्रोडक्टचा व्हिडीओ पाहाच

Fan Cover : व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कव्हरमुळे तुमच्या फॅनवर अजिबात धुळ साठणार नाही. तसेच घरामध्ये फॅन दिसताना देखील छान दिसेल. कव्हर खराब झाल्यानंतर तुम्ही ते धुवून पुन्हा फॅनवर लावू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fan Cover Viral Video :

तुमच्या घरातील विविध इलेक्ट्रीक उपकरणांना तुम्ही धुळीपासून वाचवण्यासाठी कव्हर लावत असाल. घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांना कव्हर लावलं जातं. मात्र तुमच्या घरातील पंख्याला तुम्ही कधी कव्हर लावलं आहे का? सध्या सोशल मीडियावर पंख्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कव्हरचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीने मीशो या ऑनलाईन शॉपींग अॅपवरील या प्रोडक्टची माहिती दिली आहे. पंख्यावर धुळ साचण्याच्या समस्या प्रत्येक घरात असतात. प्रत्येक महिन्याला उंच टेबलवर चढून पंखा साफ करावा लागतो. पंखा साप करताना अनेकदा खाली पडून व्यक्तींना गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशात या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कव्हरमुळे तुमच्या फॅनवर अजिबात धुळ साठणार नाही. तसेच घरामध्ये फॅन दिसताना देखील छान दिसेल. कव्हर खराब झाल्यानंतर तुम्ही ते धुवून पुन्हा फॅनवर लावू शकता. मीशोवर हे कव्हर सध्या २०० रुपयांना मिळत आहे.

तुमच्या पंख्यांनुसार तुम्ही कव्हर ऑर्डर करू शकता. यामध्ये पंख्याच्या तीन पात्यांसाठी आणि मधील राउंडसाठी वेगवेगळे चार कव्हर दिले जातात. आम्ही काही शॉपीग वेबासाईट देखील तपासल्या आहेत. मीशोसह फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या शॉपींग वेबसाईटवर देखील हे कव्हर उपलब्ध आहे. तरुणीने स्वत: हे कव्हर विकत घेऊन त्याची जाहीरात केली आहे. @rajsiiiiii या इन्स्टाग्राम अकाउंटवर तीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

फॅन कव्हरचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर अनेक मजेशीर कमेंट केल्यात. असे केल्याने फॅनची हवा लागेल की नाही? तसेच काही नेटकऱ्यांनी हस्यास्पद कमेंट देखील केल्या आहेत. अनेक व्यक्ती सध्या पूर्ण कपडे घालणं विसरून जातात आणि मीशोने थेट फॅनसाठी कव्हर बनवलंय. वा!, फॅन विथ पॅन्ट असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Homemade Hair Serum: केसांच्या वाढीसाठी घरीच बनवा खास 'होममेड सीरम', महागड्या प्रोडक्टला करेल फेल

Maharashtra News Live Update: अंजनगाव येथील विनपरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांकडून तिसरी अटक

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तडाखा; जगातील सगळ्यात टॉप गोलंदाजाला चांगलाच धुतला, व्हिडिओ तुफान व्हायरल

Private School Corruption: शिक्षण सोडून शाळा बनताहेत 'दलालीचं केंद्र', शिक्षण माफिया कशी करतात पालकांची लूट?

SCROLL FOR NEXT