Couple Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Couple Viral Video: अरे जरा तरी भान ठेवा रे! हायवेवर धावत्या दुचाकीवर बॉयफ्रेंडला मिठी मारून बसली तरुणी, पोलिसांनी पाहिलं अन्...

Couple Romance Viral Video: सोशल मीडियावर प्रेमीयुगुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, असं म्हणतात. याचा पुरेपुर वापर सोशल मीडियाद्वारे केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर प्रेमीयुगुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, असं म्हणतात. याचा पुरेपुर वापर सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. सोशल मीडियावर प्रेमवीरांचे रोमान्स करताना, डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता तर प्रेमवीर बाइकवर स्टंट करताना दिसतात. प्रेमवीरांना रोमान्स करण्यासाठी बाइक ही नवीन जागा मिळाली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कपल बाईकवरुन जाताना दिसत आहे. मुलगा बाईक चालवताना दिसत आहे. तर मुलगी त्या बाईकच्या टाकीवर बसल्याचे दिसत आहे. ती मुलगी मागच्या बाजूला तोंड करुन त्याला मीठी मारताना दिसत आहे. आपण रस्त्यावरुन जात आहोत याचेही भान त्या कपलला नाही आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ कोटा-बुंदी रोडवरील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी प्रेमवीरांचा तपास घेऊन त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यांना कान पकडून माफी मागण्यास सांगितले. याचसोबत भविष्यात असे कधीच करणार नसल्याचेही कबूल करुन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल कोटा येथील एका खाजगी कंपनीत काम करतात.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.याआधीही सोशल मीडियालर प्रेमवीरांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या जोडप्यांना चांगली शिक्षा मिळायला हवी, असं मत नेटकऱ्यांनी मांडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीला सुरुवात? शिंदे गटानंतर ठाकरेंचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी

Horoscope Monday: रागावर ठेवा नियंत्रण, 5 राशींना मिळणार नवीन संधी, पैसाही टिकेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kolhapur Politics: कोल्हापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरली, दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

Guhagar Tourism : ओ नाखवा बोटीनं फिरवाल का...; गुहागरमधील 'हा' बीच परदेशी पर्यटकांनाही खुणावतो

SCROLL FOR NEXT