Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक प्लेट बिर्याणीमुळे वाचला जीव, आत्महत्येसाठी ब्रिजवर चढलेल्या तरुणाला पोलिसांनी कसं वाचवलं? पाहा VIDEO

Kolkata Viral Video: पश्चिम बंगालमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोलकता येथे एका व्यक्तीने पुलावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दिलेल्या एका ऑफरमुळे तो व्यक्ती पुलावरुन खाली उतरला आणि त्याचा जीव वाचला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolkata Man Try To End HIs Life Stop After Police Gave Biryani Bribe:

पश्चिम बंगालमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोलकता येथे एका व्यक्तीने पुलावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दिलेल्या एका ऑफरमुळे तो व्यक्ती पुलावरुन खाली उतरला आणि त्याचा जीव वाचला. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

कोलकत्ता येथील पार्क सर्कसमध्ये ही घटना घडली आहे. एक व्यक्ती मोठ्या लोखंडी पुलावर चढून उडी मारण्याच्या प्रयत्नात होतात. त्याने पुलावरुन उडी मारुन जीवन संपवण्याची धमकी दिली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्या व्यक्तीला पुलावरुन खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्या व्यक्तीला एका प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याण देण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर हा व्यक्ती पुलावरुन खाली उतरला. हा व्यक्ती २० मिनिटे पूलावर उभा होता आणि आत्महत्या करण्याची धमकी देत होता. या प्रकारामुळे परिसरातील वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ही संपू्र्ण परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती डिप्रेशनमधून जात होता. त्याचे मानसिक स्वास्थ्य ठिक नव्हते. त्याला टाइल्सच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. त्याचा त्याच्या पत्नीशी घटस्फोटदेखील झाला होता. त्याची लहान मुलगीदेखील सोडून गेली होती. त्यामुळेच हा व्यक्ती नाखूष होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र, पोलिसांमुळे त्यांचा जीव वाचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT