Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : लहान मुलाचा हलगीवर जबरदस्त ठेका; मित्रासोबत केला लय भारी डान्स, कोल्हापुरातील चिमुकल्यांचं सर्वत्र कौतुक

kolhapur Viral Video : लहान मुलाचा हलगीवर जबरदस्त ठेका घेतला. त्याने मित्रासोबत लय भारी डान्स केला. कोल्हापुरातील चिमुकल्यांचं सर्वत्र कौतुक केलं.

Yogesh Gaikwad

मुंबई : तुम्ही सोशल मीडियावर लहान-मोठ्यांचे डान्स अनेकदा पाहिले असतील. त्यात विशेष म्हणजे कोल्हापूरातील नागरिकांचा नादच खुळा असतो. कोणताही जल्लोष असो कोल्हापूरकर मनमोकळ्या पद्धतीने साजरा करतात. त्यात लहान मुलांची देखील हजेरी मोठ्या प्रमाणात असते. अशाच एका कार्यक्रमात एका लहान मुलाने जबरा डान्स केला आहे. या लहान मुलाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेळोवेळी आनंद साजरा कसा केला पाहिजे, ते या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. हा कोल्हापुरातील लहान मुलगा हलगीच्या ठेक्यावर भन्नाट डान्स करत आहे. या लहानग्याच्या तोंडावरील हावभाव तर लयभारी आहेत.

हलगीच्या तालावर हातवारे करत आपल्या मित्रांसोबत कोल्हापुरी तडाख्यात हलगीच्या तालावर ठेका धरला आहे. या लहान मुलांचा डान्स पाहून इतरांनाही नाचायला उत्स्फूर्त करत आहेत. या मुलांचा डान्स आता सोशल मीडियावर तुफान व्हायरलं होत आहे.

धकाधकीच्या जीवनातही आनंदाचे क्षण जगायचे असतात. हे या लहानग्या मुलाच्या डान्समधून दिसत आहे. पुण्यात डिजेच्या तालावर, मुंबईत बॅंजोच्या तालावर, नाशकात नाशिक ढोलच्या तालावर, कोल्हापुरात हालगीच्या तालावर महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या शहरात भाषा संस्कृतीप्रमाणे त्याच्या वाद्यावर नागरिक जलोषात थिरकताना दिसतात. पण या लहान मुलानं हालगीच्या ठेक्यावर मोठ्यांनाही लाजवेल असा डान्स केला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT