Baby Girl Sing Song Saam TV
व्हायरल न्यूज

Baby Girl Sing Song: जिया धडक धडक..., भन्नाट एक्सप्रेशन्समध्ये चिमुकलीनं गायलं रोमँटीक गाणं; VIDEO एकदा पाहाच

Jiya Dhadak Dhadak Little Girl Sing Song: सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीनं रोमँटीक गाणं गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

लहान मुलं नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही अतरंगी प्रकार करताना दिसतात. चिमुकल्यांच्या करामती पाहायला सर्वांनाच आवडतात. कधी कधी लहान मुलं एखाद्या गाण्यावर भन्नाट डान्स करतात. तर कधी गाणी गातात. आता सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीनं रोमँटीक गाणं गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये मुलीच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सने आख्ख मार्केट खाल्लंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, चिमुकलीने जिया धडक धडक हे गाणं गायलं आहे. गाणं गाताना चिमुकली गाण्यातला प्रत्येक शब्द तालात आणि सुरात बोलण्याचा प्रयत्न करतेय. ती गाणं गाताना डोळे बंद करून एखादी चावी दिलेली बाहुली जशी डोलते तशीच ही चिमुकली दिसतेय.

गाणं (Song) गाताना ती मोठ्या आवाजातही सूर लावते. ती गात असलेलं गाणं रोमँटीक असल्याने या गाण्याचा अर्थ काय हे तिला तितकसं समजत नसावं. मात्र तरीही तरुणी गाणं गात त्यावर चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स बदलत आहे. तिचे हे क्यूट एक्सप्रेशन्स पाहून अनेकजण तिच्या प्रेमात पडलेत आणि तिच्या व्हिडीओवर (Video) कौतुकाचा वर्षांव करत कमेंट करतायत. सोशल मीडियावर चिमुकलीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

चिमुकलीचा हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल व्हिडीओमध्ये तिचे बोबडे बोल ऐकू येत आहेत. चिमुकलीच्या शाळेतील शिक्षकांनी तिचं हे गाणं फोनमध्ये रेकॉर्ड केलं असावं असं आजुबाजूचा परिसर पाहून वाटतंय. तू भविष्यात पुढे जाऊन फार मोठी गायिका होणार आहेस, असंही एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलंय. चिमुकलीचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

Maharashtra Politics: राज ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; दोन्ही बंधूंमध्ये पुन्हा बिनसलं?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार

SCROLL FOR NEXT