Fortuner Crashed Old Man Accident CCTV Footage:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: जिवाच्या आकांताने ओरडला, वेदनेने विव्हळला', वृद्धाला फॉर्च्युनरखाली निर्दयीपणे चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Fortuner Crashed Old Man Accident CCTV Footage: फॉर्च्युनर चालकाने एकदा नव्हेतर दोनदा त्याच्या अंगावर गाडी घातली. गाडी मागे घेतल्यानंतर वृद्ध व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा कार चालकाने त्याला चिरडले.

Gangappa Pujari

पुणे शहरातील हिट अँड रन केस प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे या मुलावर कडक कारवाई करण्याची मागणी होत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशच्या झाशीमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत असून एक गल्लीमध्ये टोयोटा फॉर्च्युनरने एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघाताच्या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

झाशीतील एका अरुंद रस्त्यावर टोयोटा फॉर्च्युनरने वाहनाच्या मागे जात असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला चिरडले. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. झाशीच्या सिपरी बाजार भागात ही घटना घडली. फॉर्च्युनरला एका अरुंद गल्लीतून जायचे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या होत्या. चालक गाडी पाठीमागे घेत होता. त्याचवेळी पाठीमागे उभ्या असलेला वृद्ध त्या खाली चिरडला गेला.

धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध व्यक्ती गाडीखाली चिरल्यानंतर ओरडत होता, विव्हळत होता मात्र ड्रायव्हरला त्याची कल्पनाच नव्हती. फॉर्च्युनर चालकाने एकदा नव्हेतर दोनदा त्याच्या अंगावर गाडी घातली. गाडी मागे घेतल्यानंतर वृद्ध व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा कार चालकाने त्याला चिरडले.

या दुर्घटनेत राजेंद्र गुप्ता ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी गाडीच्या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याने मुद्दाम वृद्ध व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचे आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT